Pune News : भिंत अंगावर कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, ठेकेदारावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : नव्याने सुरू असलेल्या एका बांधकाम साइटवर पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर कोसळल्याने एका बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला. (Pune News) 12 डिसेंबर रोजी ही घटना घडली होती. पुण्यातील बाणेर पाषाण लिंक रोडवरील एका नव्याने बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी ही घटना घडली. चतु:शृंगी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहन रामचंद्र घाडे असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. तर आशिष बिंद हा व्यक्ती जखमी झाला आहे. ठेकेदार रवींद्र चनबस दंडे आणि गोविंद राम सोनटक्के या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chakan News : बिकनीवर ऑडिशनच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, बाणेर पाषाण लिंक रोडवरील माऊंट क्लिअर या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. मयत रोहन हा या ठिकाणी पाण्याच्या टाकीच्या भिंतीच्या कटिंग चे काम करीत होता. यावेळी त्याच्या अंगावर भिंत पडल्याने त्याचा मृत्यू झाला.(Pune News) पोलिसांनी याप्रकरणी ठेकेदारावर आवश्यक असणाऱ्या सुविधा उपकरणे न पुरविल्याने आणि त्यांच्या बेजबाबदार वर्तनामुळे मृत्यू झाल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.