PMRDA : पायाभूत सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी पीएमआरडीए करणार 28 जागांचा लिलाव

एमपीसी न्यूज – पुणे महानगर प्रदेशविकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अंतर्गत येणाऱ्या(PMRDA) हवेली, मावळ, मुळशी आणि शिरूर या चार तालुक्यांतील 28 जागांचा लिलाव जाहीर करण्यात आला आहे. या जागांवर पायाभूत सोयी सुविधा उभारण्यासाठी हा लिलाव करण्यात येणार आहे. या लिलालाद्वारे कोट्यावधी रुपयांचा निधी पीएमआरडीएच्या तिजोरीत जमा होणार आहे.

पीएमआरडीएच्या हद्दीत पुणे जिल्ह्यातील 814 गावांचा समावेश(PMRDA) होतो. या गावांच्या विकासाचे नियोजन करण्याचे काम पीएमआरडीएकडे आहे. यातील बहुतांश गावांमध्ये मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले आहे. हवेली, मावळ, मुळशी आणि शिरुर तालुक्यातील अनेक गावे ही पुर्णपणे विकसीत झाली आहेत. मोठ मोठ्या रहिवासी इमारती, व्यावसायीक इमारती येथे उभ्या राहिल्या आहेत. मात्र, अद्यापही येथे पायाभूत सोयी सुविधांची काही प्रमाणात कमतरता आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी पीएमआरडीएच्या हद्दीतील पीएमआरडीएच्या मालकीच्या मोक्याच्या जागांचा लिलाव करण्यात येणार आहे.

Pune : ओरिगामीचे ‘वंडरफोल्ड’ प्रदर्शन येत्या 23 नोव्हेंबर पासून

या लिलावानंतर या जागा संबंधित व्यक्तीला पायाभूत सोयी सुविधा विकसीत करण्यासाठी देण्यात येणार आहे. जागांच्या ई लिलावाच्या प्रक्रियेची सविस्तर माहिती पीएमआरडीएच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. लिलावात सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करण्यासाठी सात नोव्हेंबरपासून सुरुवात करण्यात आली आहे. प्रत्यक्ष लिलाव प्रक्रिया 13 डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता होणार आहे.

केसनंद, खेड शिवापूर, लोणी काळभोर, लोणीकंद, हिंजवडी, माण, भूगाव, पिरंगूट, मारुंजी, नांदे, सोमाटणे, शिरुर या गावांमधील जागांचा होणार लिलाव होणार आहे. या गावांमध्ये 400 चौरस मीटर पासून 3 हजार चौरस मीटर जागा लिलावासाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पीएमआरडीएने या जागांची किंमत साडेतीन लाखांपासून ते पावनेदोन कोटींपर्यंत ठेवली आहे. लिलावामध्ये जो जास्त बोली लावेल त्यालाच या जागा मिळणार आहेत.

या जागांवर रुग्णालय, छोटा दवाखाना, व्यायामशाळा, स्पोर्ट कॉम्पेक्स, शॉपिंग कॉम्पेक्स, शाळा, महाविद्यालय, लोकांच्या उपयोगाच्या इतर इमारती उभारता येणार आहेत. पीएमआरडीएकडून ऑनलाईन पद्धतीने लिलाव करण्यात येणार आहे. लिलावामध्ये जो जागेची सर्वात जास्त किंमत लावेल त्यालाच 80 वर्षांच्या कराराने जागा भाडेतत्वावर देण्यात येईल. भाडेत्तवावर जरी जागा असली तरी त्याला मालकीहक्काचे सर्व अधिकार प्रदान करण्यात येतील. पहिले तीन वर्षे या जागेला कोणतेही जागा भाडे आकरण्यात येणार नाही. त्यानंतर तिसऱ्या वर्षी जागेच्या किमतीच्या एक टक्का, पाचव्या वर्षी दोन टक्के आणि दहा वर्षांनतर तीन टक्के वार्षीक भाडे आकारण्यात येईल. संबंधित जागा मालक ही जागा दुसऱ्या कोणालाही भाडेतत्वाने देऊ शकतो.

पीएमआरडीएचे जनसंपर्क अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रामदास जगताप म्हणाले, “पीएमआरडीएकडे असणाऱ्या जागांचा नेहमीच लिलाव करण्यात येतो. सध्या हवेली, मावळ, मुळशी आणि शिरुर तालुक्यांतील 28 जागांचा लिलाव होणार आहे. लिलावासाठी नावनोंदणी सुरु झाली असून 13 डिसेंबर रोजी प्रत्यक्ष लिलाव होणार आहे.”

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.