Police Transfer : पुणे आणि पिंपरी-चिंचवड़ पोलीस आयुक्तांची बदली, विनयकुमार चौबे पिंपरी-चिंचवड़ चे नवीन पोलीस आयुक्त तर रितेश कुमार पुण्याचे पोलीस आयुक्त

एमपीसी न्यूज :  पुणे आणि पिंपरी-चिंचवड़ पोलीस आयुक्तांची बदली करण्यात आली आहे. विनयकुमार चौबे यांची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर पुण्याचे आयुक्त अमिताभ गुप्ता यांची बदली झाली असून त्यांच्या जागी आता रितेश कुमार नवे आयुक्त असतील. पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची कायदा व सुव्यवस्था महाराष्ट्र राज्य, मुंबई अप्पर पोलीस महासंचालक या पदावर बदली करण्यात आली आहे.

राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून त्यासंबंधित शासन आदेश जारी करण्यात आला आहे.अंकुश शिंदे हे सध्याचे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त असून त्यांच्या जागी विनयकुमार चौबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मिरा भाईंदरचे पोलिस आयुक्त सदानंद दाते यांची बदली झाली असून ते आता राज्याच्या दहशतवादी विरोधी पथकाचे अपर पोलिस महासंचालक असतील. तसेच विश्वास नांगरे पाटील यांची बृहन्मुंबई सहपोलिस आयुक्त  कायदा व सुव्यवस्था, बृहन्मुंबई यांची अप्पर पोलीस महासंचालक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य मुंबई या पदावर बंदली करण्यात आली आहे.

पुण्याचे आयुक्त अमिताभ गुप्ता यांची बदली झाली असून त्यांच्या जागी आता रितेश कुमार नवे आयुक्त असतील. रितेश कुमार हे राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुणे (सीआयडी) प्रमुख म्हणून अतिरिक्त पोलिस महासंचालक होते. रितेश कुमार हे 1992 साल चे आय पी एस अधिकारी आहेत.

 

मिलिंद भारंबे, विशेष पोलीस महानिरीक्षक, कायदा व सुव्यवस्था, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांची पदोन्नतीने पोलीस आयुक्त नवी मुंबई या पदावर बदली करण्यात आली आहे.

राज वर्धन, सह पोलिस आयुक्त, वाहतूक, बृहन्मुंबई यांची अप्पर पोलीस महासंचालक नि- सह व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई या पदावर पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे. पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेल्या निकेत कौशिक यांची अप्पर पोलीस महासंचालक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई या पदावर बदली करण्यात आली आहे.

पदस्थापनेच्या प्रतिक्षेत असलेले शिरीष जैन यांची सह आयुक्त, राज्य गुप्त वार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई या पदावर बदली करण्यात आली आहे. संजय मोहिते विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र नवी मुंबई यांची विशेष पोलीस महानिरीक्षक, कायदा व सुव्यवस्था पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय, मुंबई या पदावर बदली करण्यात आली आहे.

नामदेव चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त, पुणे शहर यांची पोलीस उपनिरीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे या पदावर बदली करण्यात आली आहे. रंजन कुमार शर्मा, पोलीस उप महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांची अप्पर पोलीस आयुक्त विशेष शाखा बृहन्मुंबई या पदावर बंदी करण्यात आली आहे.नवीन चंद्र रेड्डी, अप्पर पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांची पोलीस आयुक्त, अमरावती शहर या पदावर बदली करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची नाशिक शहर पोलीस आयुक्त पदी बदली करण्यात आली आहे. यासंदर्भातचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने आज काढले आहेत. प्रशांत बुरडे, अप्पर पोलीस महासंचालक व मुख्य दक्षता  अधिकारी, महाडा, मुंबई यांची अप्पर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य पुणे या पदावर बंदली करण्यात आली आहे.
प्रवीण पवार, संचालक, महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी, पुणे यांची विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, कोकण या पदावर बदली करण्यात आली आहे. सुनील फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, मोटार परिवहन, पुणे यांची विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक या पदावर बदली  करण्यात आली आहे

आरती सिंह, पोलीस आयुक्त, अमरावती शहर यांची अप्पर पोलीस आयुक्त, सशस्त्र पोलीस, बृहन्मुंबई या पदावर बदली करण्यात आली आहे. निसार तांबोळी, पोलीस उप महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र, नांदेड यांची अप्पर पोलीस आयुक्त, वाहतूक, बृहन्मुंबई या पदावर बदली करण्यात आली आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.