Pandit Jawaharlal Nehru Birthday: पं.नेहरूंचे विचार आता जास्तच औचित्यपूर्ण – श्रीरंजन आवटे

एमपीसी न्यूज – ‘नेहरूंचे विचार त्यांच्या काळापेक्षा ते आज अधिक औचित्यपूर्ण आहेत. नेहरूंबद्दल भारतभर जिव्हाळा, आदर होता. राष्ट्राच्या सुकाणूस्थानी बसलेले नेहरू हे बहुआयामी व्यक्तिमत्व होते, असे मत व्याख्याते प्रा.श्रीरंजन आवटे यांनी व्यक्त केले.

‘संविधानिक राष्ट्रवाद मंचा’च्या वतीने, भारताचे पहिले पंतप्रधान आणि विश्वनेते पं.जवाहरलाल नेहरू यांच्या 133 व्या जन्मदिनानिमित्त (Pandit Jawaharlal Nehru Birthday) सोमवारी (दि.14) सायंकाळी आयोजित ‘ सोहळा पंडित नेहरूंच्या विचाराचा ‘ या प्रा. श्रीरंजन आवटे यांच्या व्याख्यानाला चांगला प्रतिसाद मिळाला. प्रसाद झावरे, प्रशांत कोठडिया , अंजली चिपलकट्टी उपस्थित होते. कलीम अझीम , श्रुती तांबे यांनी स्वागत केले. विठ्ठल मणियार, डॉ. प्रदीप आवटे, जांबुवंत मनोहर, रवींद्र धनक यांच्यासह अनेक मान्यवर सभागृहात उपस्थित होते.

World Diabetes Day: मधुमेहापासून बचावासाठी तणावमुक्त जीवन जगणे महत्त्वाचे – डॉ. राजेंद्र वाबळे

या व्याख्यानामधून पंडितजींचे विचारविश्व आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या काही महत्त्वाच्या परिमाणांचा वेध घेण्याचा प्रयत्न श्रीरंजन आवटे यांनी केला. तर दुसऱ्या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इतिहास विभागाच्या प्रमुख डॉ. प्रा. श्रद्धा कुंभोजकर या होत्या.

श्रीरंजन आवटे पुढे म्हणाले की, ‘फाळणीची जखम घेऊन भारताची सुरवात झाली. भाषणांपेक्षा कृतीशी नेहरूंचे नाते असल्याने भारताची प्रगती झाली. नेहरूंच्या विचारात संसदीय लोकशाही, सर्वसमावेशक राष्ट्रवाद, वैश्विक विचार, समाजवादी प्रारुप, वैज्ञानिक दृष्टीकोन हे पैलू महत्वाचे आहेत. विद्यमान पंतप्रधानांनी नेहरूंना वारंवार जबाबदार ठरवल्याने नेहरू अधिक अभ्यासले जात असले तरी नेहरूंची परंपरा जपण्यात आपण कमी पडलो आहोत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.