Pune : दत्तमंदिरात १०१ किलो चक्क्याची शंकराची पिंड आणि मुखवटा

एमपीसी न्यूज – पुण्यातील बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे महाशिवरात्रीनिमित्त दत्तमंदिरात १०१ किलो चक्क्याची शंकराची पिंड, मुखवटा आणि फळा-फुलांची आरास करण्यात आली. सुकामेवा, फळे आणि विविध प्रकारच्या फुलांचा वापर करुन साकारण्यात आलेली ही चक्केश्वराची पूजा पाहण्याकरीता भाविकांनी मोठया प्रमाणात गर्दी केली. माधव जोशी यांनी साकारलेला शंकराचा मुखवटा विशेष आकर्षण ठरला.

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष शिरीष मोहिते, कार्यकारी विश्वस्त बी.एम.गायकवाड, खजिनदार अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, उत्सवप्रमुख चंद्रशेखर हलवाई, उपउत्सवप्रमुख उल्हास कदम, विश्वस्त अंकुश काकडे, अ‍ॅड.एन.डी.पाटील, युवराज गाडवे, नंदकुमार सुतार आदी उपस्थित होते.

  • शिल्पकार सचिन जोशी, प्रदीप गाडे यांसह मंदिरातील व्यवस्थापक विजय पाचंगे, निलेश धर्माधिकारी, युवराज पवार, शोभा गादेकर, लक्ष्मीबाई पत्की, नांगरे मावशी, कल्लाप्पा घेरडे, वैभव निखाले, भारती माटे, राजहंस गुरुजी यांनी चक्क्याची शंकराची पिंड आणि आरास चार तासात साकारली. पुरुषोत्तम वैद्य गुरुजी यांनी पौरोहित्य केले. मधुकर दहातोंडे यांनी फुलांची सजावट केली.

यावेळी चंद्रशेखर हलवाई म्हणाले, महाशिवरात्रीनिमित्त दत्तमंदिरात दरवर्षी चक्केश्वराची पूजा करण्यात येते. यावर्षी १०१ किलो चक्का वापरुन शंकराची पिंड साकारण्यात आली. भगवान शंकराचा केलेला मुखवटा हे विशेष आकर्षण होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.