Talegaon : भाजी विक्रेते आणि फळविक्रेते यांची चौकशी करून त्यांना ओळखपत्र द्या ; माहिती अधिकार कार्यकर्ता प्रदीप नाईक यांची मागणी

एमपीसी न्यूज – पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर आणि देशहितासाठी मावळ तालुक्यातील परप्रांतीय तसेच बांगलादेशी नागरिकांचे यांचे मावळातील वास्तवबाबत याची सखोल चौकशी करण्यात यावी. भाजी विक्रेते आणि फळविक्रेते यांची नगरपालिकेकडून सखोल चौकशी करून त्यांना ओळखपत्र देण्यात यावे, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता प्रदीप नाईक यांनी पोलीस निरिक्षक भानुदास जाधव यांच्याकडे लेखीनिवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की, मावळातील तळेगाव दाभाडे हद्दीतील सर्व भाजी विक्रेते आणि फळविक्रेते यांची नगरपालिकेकडून सखोल चौकशी करून त्यांना ओळखपत्र देण्यात यावे. या सर्व विक्रेत्यांची माहिती नगरपालिकेने तळेगाव पोलीस स्टेशनला कळवण्यात यावी तसेच भाडेतत्त्वावर मावळात राहणाऱ्या प्रत्येक परप्रांतीय नागरिकाची माहिती पोलीस स्टेशनला कळवणे बंधनकारक करावे.

  • तसेच घर मालकाने ही माहिती पोलिस स्टेशनला कळवावी मावळातील सर्व सामाजिक संस्थांनी सुद्धा या विषयात लक्ष घालून पोलिसांना सहकार्य करावे व बांगलादेशी व परप्रांतीयांना (जे गुन्हेगार आहेत ते देशाविरुद्ध लढणार्‍यांना) मावळातून हाकलून देण्यात यावे. देशाच्या कार्यात सहभाग घ्यावा. कोणताही संशयित व्यक्ती आढळला तर त्याची संबंधित माहिती त्वरित पोलिस स्टेशनला कळवावी किंवा (100) नंबरला कळवावी. आपण आपल्या भारतमातेच्या संरक्षणार्थ आपले योगदान द्यावे.

आपण या सर्व फळ विक्रेत्यांची आणि भाडेकरूंची सखोल चौकशी करून जे कोण दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी .सर्व आपल्या भारतीय नागरिकांना मी विनंती करू इच्छितो की आपल्याला जर कोण संशयित व्यक्ती आढळला आपण त्वरित खालील दिलेल्या (०२११४ २२२ ४४४) नंबरवर संपर्क करावा. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विनोद भेगडे, सामाजिक कार्यकर्ते करण हेंद्रे, उद्योजक किरण घारे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.