Pune : लहान मुले भिक मागताना आढळल्यास फोटो काढा आणि….


एमपीसी न्यूज – शहरात कुठेही तुम्हाला जर भिक मागताना लहान मुले आढळली तर अशा मुलांचे फोटो काढा आणि पुणे पोलिसांच्या ट्विटर हँडलवर #आम्ही एकत्र आहोत या हॅश टॅग खाली टॅग करा, असे आवाहन पुणे पोलिसांच्या वतीने ट्विटरद्वारे करण्यात आले आहे.

शहरातील सिग्नलवर भिका-यांचा उपद्रव वाढला असताना पुणे पोलिसांनी त्याविरोधात आता मोहिम उघडली आहे. नागरिकांना शहरात कुठेही लहान मुलगा भिक मागताना आढळल्यास त्याचा फोटो काढून, तो फोटो कुठे आणि किती वाजता काढला याची माहिती @PuneCityPolice या ट्विटर हॅन्डलवर # आम्ही एकत्र आहोत हा हॅशटॅग वापरून टॅग करण्याचे आवाहन पोलिसांनी ट्विटरद्वारे केले.

शहरातील कुठल्याही सिग्लनवर गाड्या थांबल्या की लहान मुले उघड्या अंगाने चालकाकडे भिक मागतानाचे चित्र दिसुन येते.  भिक मागणा-या या लहानग्यांमुळे गाडी चालवताना चालकांना कसरत करावी लागते. याशिवाय भर चौकात ग्रुपने थांबणे, गाडीच्या समोर जाऊन पैसे मागणे, यामुळे वाहन चालकांना त्रास होतो. सिग्नलवर बंदोबस्ताला असणा-या पोलिसांनाही हे भिकारी जुमानत नाहीत. कुणी तक्रार केलीच तर पोलिस भिकाऱ्यांना हाकलतात. परंतू पाच-दहा मिनिटांनी जैसे थे परिस्थिती होते. त्यामुळे चौकातील भिकाऱ्यांना हटवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.