Pune : हॉटेलला लागलेल्या आगीत 2 कामगारांचा मृत्यू,तर एक जण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – पुण्यातील मार्केटयार्ड येथील हॉटेल रेवळ सिद्धि येथे आग (Pune ) लागल्याची घटना घडली. या आगीत 2 कामगाराचा होरपळून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.तर एक जण गंभीर जखमी झाले आहेत.

Today’s Horoscope 13 June 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्केटयार्ड येथील गेट नंबर एक जवळ असलेल्या हॉटेल रेवळ सिद्धि येथे मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास आग लागली.या आगीत हॉटेलच्या आतील बाजूस असलेल्या पोटमाळ्यावर तीन कामगार झोपले होते. त्यातील दोघांचा (अद्याप मृतांची नावे समजू शकली नाहीत) या आगीत जागीच मृत्यू झाला.

 

तर एकावर जवळील रूग्णालयात उपचार सुरू आहे.या आगीचे नेमके कारण समजू शकले (Pune ) नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.