Pune :‌‘कालजयी’ कार्यक्रमाअंतर्गत शब्द-चित्रातून उलगडले युगप्रवर्तक पंडित कुमार गंधर्व

एमपीसी न्यूज – लोकसंगीतातील धूनउगम रागांवर पंडित कुमारजींनी ( Pune ) पितृतुल्य प्रेम केले. संगीतातील सादरीकरण करताना ते समयचक्राविषयी, सिद्ध आणि शुद्ध राग सादर करण्याविषयी आग्रही होते. त्यांना अमूर्ततेचे आकर्षण होते. पंडितजी कलाकार म्हणून युगपुरुष होते; परंतु व्यक्ती म्हणून अतिशय साधे-भाबडे पण शब्दाला पक्के होते, अशा भावना युगप्रवर्तक, विख्यात हिंदुस्तानी शास्त्रीय गायक  पंडित कुमार गंधर्व यांनी व्यक्त केल्या.कुमार गंधर्व प्रतिष्ठानतर्फे ‌‘कालजयी’ कार्यक्रमाअंतर्गत रविवारी सायंकाळी नॅशलन फिल्म अर्काइव्ह येथे परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी ते बोलत होते.

 

कुमार गंधर्व यांची गायकी दृक-श्राव्य चित्रफितीतून अनुभवायला मिळाल्याने उपस्थित भावूक झाले. कार्यक्रमास संगीत-कला क्षेत्रातील दिग्गज कलाकार उपस्थित होते.यात प्रसिद्ध हिंदुस्तानी शास्त्रीय गायिका अलका देव-मारुलकर, युवा संगीतकार, संशोधक आणि लेखक सृजन देशपांडे, चित्रकार आणि संगीतप्रेमी जयंत भीमसेन जोशी, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश व कुमारजींच्या संगीताचे चाहते मुकुल मुद्गल, पत्रकार-लेखक सोपान जोशी, चित्रकार, गायिका, नाट्य अभिनेत्री आणि लेखिका माधुरी पुरंदरे यांचा सहभाग होता. त्यांच्याशी रेखा इनामदार-साने यांनी संवाद साधला.

यावेळी अलका देव -मारुलकर म्हणाल्या, कुमारजींची कलंदर वृत्ती त्यांच्या गायनातूनही दिसून येत असे. प्रत्येक रागात सगळे स्वर लागतात ही मोठी शिकवण त्यांच्याकडून मला मिळाली. गायनामध्ये गायकाचे व्यक्तिमत्त्व प्रतिबिंबीत ( Pune )  होणे ही दिव्य घटना आहे असे ते मानत. गायकाने आवाज घडविण्याची गरज नाही कारण त्यात मूळ आवाज हरवून जातो. गरज नसलेल्या रागांमध्ये खर्जाचा वापर करू नये, नवराग-जोडरागांची निर्मिती सारासार विचार करून करावी या विषयी त्यांची स्पष्ट मते होती.

जयंत भीमसेन जोशी म्हणाले, कुमारजी फार रितीचे होते. त्यांच्यात तेज-अभिरुची-पलता होती. ते आनंदाचा अर्क होते. गायनातून त्यांनी स्वत: आनंद घेतल्यामुळे ते रसिकांनाही आनंद देत असत. कमीत कमी सूरांमध्ये अचूकतेने रागाचे विश्व उभे कराण्याची जादू कुमारजींकडे होती. कुमारजी आध्यत्मिकदृष्ट्या वेगळ्या पातळीवर होते.

Pune : हॉटेलला लागलेल्या आगीत 2 कामगारांचा मृत्यू,तर एक जण गंभीर जखमी

कुमारजी छोट्या-छोट्या गोष्टीतून आनंद घेत असल्याचे सांगून मुकुल मुद्गल म्हणाले, निसर्ग, पशु-पक्षी यांची त्यांना आवड होती. अचूकता आणि दिलेला शब्द आणि वेळ पाळणे ही त्यांची स्वभाववैशिष्ट्ये होती. खाणे आणि खिलविणे याची त्यांना विशेष आवड होती.

कुमार गंधर्व यांच्याविषयीच्या ‌‘कुमारस्वर एक गंधर्व कथा’ या पुस्तकाची निर्मिती कशी झाली याचे विवेचन करून माधुरी पुरंदरे म्हणाल्या, माझा व कुमारजींचा परिचय नव्हता. त्यांना मी मैफलीतच पाहिले होते. हे पुस्तक किशोरवयीन मुलांसाठी लिहायचे आहे हा विचार मनात ठेवून कुमार गंधर्वांची साधी-सरळ गोष्ट सांगावी अशा विचाराने मी लिहिती झाले. या पुस्तक निर्मितीतील कालावधीत मी कुमार गंधर्वमय होऊन आनंद उपभोगला.

सोपान जोशी यांनीही कुमार गंधर्व यांच्याविषयी ‌‘शिवपुत्र कथा’ हे हिंदी आणि इंग्रजी भाषेत पुस्तक लिहिले असून त्या विषयी बोलताना ते म्हणाले, आजच्या पिढीला जीवन कसे जगता येते हे कळले पाहिजे या हेतूने या पुस्तकाची निर्मिती करण्याचे ध्येय मनात ठरवले होते. विख्यात व्यक्ती बालकाप्रमाणे जगू शकते, आनंद घेऊ शकते, सहज असते हे आजच्या काळात पहायला मिळणे अवघड आहे. त्यामुळे मोठेपण सहजतेने कसे निभावता येते याचे उदाहरण या पुस्तकातून वाचकांपर्यंत नक्की पोहोचेल.

पंडित कुमार गंधर्व समकालीन गायकांमध्ये वेगळे का वाटतात याचे सखोल चिंतन करत सृजन देशपांडे यांनी दृक- श्राव्य माध्यमातून पंडितजींचे सांगीतिक जीवन रसिक श्रोत्यांपुढे उलगडले.

परिसंवादात सहभागी मान्यवरांचे स्वागत कलापिनी कोमकली आणि भुवनेश कोमकली यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.