Pune : गणेशोत्सवासाठी 200 स्वच्छतागृह, तीन व्हॉनिटी व्हॅन, पोलीस व मनपा कर्मचाऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था

एमपीसी न्यूज : गणेशोत्सवसाठी पुण्यात येणाऱ्या भाविकांची (Pune) गैरसोय टळावी यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला असून, लोकसहभागातून 200 स्वच्छतागृहे, गरोदर महिलांना आरामासाठी आणि महिलांना तीन व्हॉनिटी व्हॅन स्वरुपात हिरकणी कक्ष; तसेच पोलीस तथा महापालिका कर्मचाऱ्यांना जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात येणार आहे.

गणेशोत्सवाचे शेवटचे तीन दिवस आणि अनंत चतुर्दशीला ही व्यवस्था पुणे शहरातील गर्दीच्या ठिकाणी करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण. दरवर्षी यासाठी पुणे आणि आसपासच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात गणेशभक्त गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात.

त्यामुळे परगावाहून पुण्यात आलेल्या गणेश भक्तांची विशेष करुन महिलांची स्वच्छतागृहांआभावी अडचण होत असते. त्यामुळे ही अडचण दूर करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला असून; लोकसहभागातून 200 स्वच्छतागृहे, गरोदर महिलांना आरामासाठी आणि महिलांना तीन व्हॉनिटी व्हॅनच्या माध्यामातून हरकणी कक्ष; तसेच पोलीस तथा महापालिका कर्मचाऱ्यांना जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात येणार आहे.

याबाबत अधिक माहिती देताना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Pune) म्हणाले की, पुणे शहरातील गणेशोत्सव संपूर्ण जगात आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.

पुणे जिल्हा आणि आसपासच्या परिसरातून हजारो भाविक गणेश दर्शन आणि अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी येत असतात.

त्यामुळे परगावाहून पुण्यात आलेल्या गणेश भक्तांची विशेष करुन महिलांची स्वच्छतागृहांआभावी मोठी अडचण होते. ती दूर करण्यासाठी लोकसहभागातून 200 स्वच्छतागृहे, व्हॅनिटी व्हॅनच्या स्वरुपात तीन हिरकणी कक्ष आणि पोलीस तथा मनपा कर्मचाऱ्यांसाठी मोफत जेवणाची व्यवस्था केली आहे.

यावेळी गणेशभक्तांची गैरसोय टळणार असून, उत्सवाचा आनंद सहज लुटता येणार आहे.

Today’s Horoscope 26 September 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.