Today’s Horoscope 26 September 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 26 September 2023
वार – मंगळवार.
26.09.2023
शुभाशुभ विचार- उत्तम दिवस.
आज विशेष- भागवत एकादशी.
राहू काळ – दुपारी 3.00 ते 04.30
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आजचे नक्षत्र – श्रवण 09.42 पर्यंत नंतर धनिष्ठा.
चंद्र राशी – मकर 20.28 पर्यंत नंतर कुंभ.
————————————
मेष – ( शुभ रंग- गुलाबी )
कार्यक्षेत्रातील तुमच्या अति व्यस्ततेमुळे आज तुम्हाला कुटुंबीयांची नाराजी पत्करावी लागेल. नोकरदारांना आज वरिष्ठांच्या मागे पुढे करावेच लागणार आहे.

वृषभ (शुभ रंग- मरून )
तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना आज दैवाची उत्तम साथ लाभेल. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत आखाल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. ज्येष्ठ मंडळी सत्संगात रमतील.

मिथुन ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी )
आज जे काही कराल ते तब्येतीला जपूनच करा. आपल्या कुवती बाहेर जबाबदाऱ्या स्वीकारू नका. गोडबोल्या मंडळी पासून लांब राहिलेले बरे. जोडीदार जे सांगेल तेच योग्य असेल.

कर्क (शुभ रंग- निळा )Today’s Horoscope 26 September 2023
उद्योगधंद्यातील वाढत्या स्पर्धेला समर्थपणे तोंड द्याल. अडचणीत जोडीदाराची खंबीर साथ राहील. आज तुम्ही एखादा विवाह जुळवण्यात यशस्वी मध्यस्ती कराल.

सिंह (शुभ रंग- आकाशी)
नोकरदारांवर कामाचा वाढता ताण राहील. कामे पूर्ण करण्यासाठी कामाचे तास वाढवावे लागतील. आज जोडीदार जे म्हणेल त्याला होच म्हणणे हिताचे असेल.

कन्या ( शुभ रंग- भगवा)
आज सौंदर्य प्रसाधनांचे व्यवसाय तेजीत चालतील. कला क्रीडा क्षेत्रातील मंडळी उत्कृष्ट कामगिरी करतील. उच्चशिक्षित मंडळींच्या महत्त्वाकांक्षा वाढतील. आज ज्येष्ठांना काय प्रकृती उत्तम साथ देईल

तूळ ( शुभ रंग- केशरी )
आज तुमच्यासाठी गृह सौख्याचा दिवस असून कौटुंबिक सदस्यात खेळीमेळीचे वातावरण असेल. अत्यंत सकारात्मकतेने आजच्या दिवसाची सुरुवात कराल. आज तुम्ही गरजूंना मदत कराल.

वृश्चिक (शुभ रंग- जांभळा)
कार्यक्षेत्रात आज विरोधकांशीही गोड बोलून आपला स्वार्थ साधून घ्यावा लागेल. आज बेरोजगारांना नोकरीचे कॉल्स येतील. आज आलेली कुठलीही संधी वाया घालवू नका.

धनु- (शुभ रंग- पांढरा )
आज तुमची आर्थिक बाजू भक्कम राहील. एखाद्या महत्त्वाच्या बातमीने आजच्या दिवसाची सुरुवात होईल. आज आपल्या जोडीदाराचे मन जपण्याचा तुम्ही प्रयत्न कराल

मकर ( शुभ रंग- लाल )
आज कार्यक्षेत्रात तुमच्या प्रगतीचा आलेख उंचावेल. नवीन आव्हाने आत्मविश्वासाने स्वीकाराल. जोडीदारास अभिमानास्पद वाटणारी एखादी कामगिरी तुमच्या हातून होईल.

कुंभ (शुभ रंग – मोतिया)
आज काटकरसरी वृत्तीस थोडा लगाम घालून काही अत्यावश्यक खर्च करावेच लागणार आहेत. घरात थोरांच्या हो हो करून वाद आवरते घ्या. प्रवासात तब्येत जपा.

मीन -(शुभ रंग – हिरवा)
एखाद्या नव्या उपक्रमाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. नोकरदारांच्या रास्त मागण्या वरिष्ठ मान्य करतील. वास्तु वाहन खरेदीसाठी कर्ज मंजुरी होईल.

श्री जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

Talegaon Dabhade : शहर भाजपा अध्यक्षपदी अशोक दाभाडे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.