Talegaon Dabhade : शहर भाजपा अध्यक्षपदी अशोक दाभाडे

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) शहर भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी अशोक दादाभाऊ दाभाडे यांची नियुक्ती करण्यात आली. पुणे जिल्हा उत्तर विभागाचे जिल्हाध्यक्ष शरद बुटे पाटील यांनी दाभाडे यांना नियुक्तीचे पत्र दिले.

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे येथे जागतिक फार्मसिस्ट दिवस उत्साहात साजरा

पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या कोर कमिटीची बैठक नुकतीच पार पडली. यामध्ये उत्तर विभागातील काही मंडलातील अध्यक्ष पदाची निवड करण्यात आली. मावळ तालुक्यातील लोणावळ्याच्या अध्यक्षपदी अरुण वसंतराव लाड, मावळ ग्रामीणसाठी दत्तात्रय शंकर गुंड, देहूरोडसाठी लहू उर्फ रवींद्र सहादू शेलार तर तळेगाव दाभाडे भाजपाचे अध्यक्षपदी अशोक दादाभाऊ दाभाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

श्री दाभाडे यांनी तळेगाव दाभाडे शहर भारतीय जनता पक्ष कामगार आघाडीचे अध्यक्षपद,सरसेनापती उमाबाई दाभाडे नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन पद भूषविले असून सुप्रीम इंडस्ट्री कामगार युनियनचे विद्यमान अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पडत आहेत. त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत असून कामगार वर्गामध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.