Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे येथे जागतिक फार्मसिस्ट दिवस उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – इंडियन फार्मासूटिकल्स असोसिएशन, सिद्धांत कॉलेज ऑफ फार्मसी व पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक फार्मसिस्ट दिवस तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथे साजरा करण्यात आला.

Chinchwad : चिंचवडमध्ये साकाराला श्री.स्वामी समर्थांचा प्रकट सोहळयाचा आकर्षक देखावा

सर्व फार्मसिस्ट बंधू भगिनींना त्यांच्या केमिस्ट स्टोअर येथे जाऊन गुलाब पुष्प व प्रशस्ती पत्रक देऊन फार्मसिस्ट दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. इ सी मेंबर सुरेशशेठ यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धांत कॉलेजच्या प्राध्यापिका श्वेता मंत्री (मणियार ), केमिस्ट असोसिएशन तळेगाव दाभाडे शहर अध्यक्ष प्रमोद दाभाडे,मावळ तालुका सचिव आशिष काणे, खजिनदार नेमिचांद गुंदेशा,धर्मेश पटणी,प्रदीप मुंगसे,संतोष शाह,गौरंग मेहता व फार्मसी कॉलेजचे विद्यार्थी यांनी या उपक्रमात सहभागी झाले.

प्रमोद दाभाडे यांनी आरोग्य विभागातील एक महत्वाचा घटक फार्मसिस्ट,कोरोना काळ असू किंवा दुसरी कसली आपत्ती नेहमी मदतीची भावना ठेऊन पुढे राहिलेला अश्या माझ्या सर्व फार्मसिस्ट बंधू भगिनींना फार्मसिस्ट दिनाच्या हार्दिक शुभेच्या दिल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.