Pune : शहरातील ऐतिहासिक सिटी चर्चला 225 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ख्रिस्ती बांधवांचा आनंदोत्सव (व्हिडीओ)

पेशव्यांच्या वंशजांचा विशेष सत्कार

एमपीसी न्यूज – आकर्षक विद्युत रोषणाई. ..बॅडचे सुमधूर वादन… बायबलच्या वाचनातून मिळणारे येशूचे समाजहित जोपासणारे संदेश…, ख्रिस्ती बांधवांना फादरकडून मिळणारे मौल्यवान मार्गदर्शन. .., जिजससाठी करण्यात येणारी ख्रिश्चन धर्मियांची प्रार्थना अशा आनंददायी वातावरणात सिटी चर्चचा 225 वर्षपूर्ती सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सिटी चर्चला 225 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त चर्चच्या वतीने कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. फादर सल्वादोर पिंटो, बिशप थाॅमस डाबरे, फादर इसीडूर साॅर्स, बिशप फिलीप नेरीदा रोझरी फॅरो, बिशप वॅलेरियन डिसोझा यांनी बायबलच्या वाचनातून उपस्थित ख्रिस्ती बांधवांना उपदेश केला.

हे चर्च बांधण्यासाठी सवाई माधवराव पेशवे यांनी सुमारे 4 एकर जागा दिली होती. त्यामुळे या निमित्ताने पेशव्यांचे वंशज विनायकराव पेशवे, महेंद्र पेशवे, पुष्कर पेशवे तसेच नाना फडणवीस यांचे वंशज अशोक फडणवीस यांचा पुणेरी पगडी परिधान करून विशेष सत्कार करण्यात आला.

8 डिसेंबर 1792 मध्ये सध्याच्या चर्चची पायाभरणी होऊन प्राथमिक शेड बांधली गेली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने बांधकाम होत चर्चची प्राथमिक वास्तू आकारास आली. सुमारे वर्षभरात सन 1793 मध्ये चर्चची बांधणी पूर्ण झाली. त्यानंतर आजपर्यंत 8 डिसेंबर स्थापना दिन आणि 25 डिसेंबर ख्रिसमस दिन येथे साजरा होतो व त्यात श्रीमंत पेशव्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. यंदा या चर्चच्या स्थापनेस 8 डिसेंबर रोजी 225 वर्षे झाल्यानिमित्त विशेष भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये शोभायात्रा, धार्मिक विधी, कोनशिलेचे अनावरण, प्रार्थना व प्रवचन, प्रसाद या बरोबरच कृतज्ञता म्हणून श्रीमंत पेशव्यांच्या वंशजांचा देखील सत्कार करण्यात आला.

"peshwe

"Vanshaj"

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.