Pune : पोलिसांना माहिती पुरवत असल्याच्या संशयातून 16 वर्षीय तरुणाचा खून

एमपीसी न्यूज – पोलिसांना आणि विरुद्ध गटाच्या लोकांना माहिती पुरवत असल्याच्या संशयावरून ( Pune) एका सोळा वर्षे मुलाचा खून करण्यात आला. कुख्यात गुन्हेगारांनी हे कृत्य केले. कोंढवा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. तर त्यातील मुख्य आरोपी पसार झाले आहेत.

Chinchwad : विद्यार्थ्यांचे ज्ञान समाजाभिमुख असावे – प्रा. गणेश शिंदे

महादेव गोविंद गजाकोष उर्फ पप्पु (वय 19, रा. शिवनेरी), प्रणय सुनिल पवार (वय 19) व सौरभ माणिक तायडे उर्फ दत्ता (वय 18) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, एका अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले आहे. याघटनेत अनुष अमोल पायाळ (वय 16, रा. एनआयबीएम रोड) याचा खून झाला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साया लोणकर उर्फ साईनाथ तसेच ओंकार कापरे उर्फ अप्पा हे मुख्य आरोपी आहेत. दरम्यान ते पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, एकावर एमपीडीए तसेच तडीपाराची कारवाई केलेली आहे.अल्पवयीन मुलगा आणि त्याच्यासोबत असलेला त्याचा मित्र आणि आरोपी ओळखीचे आहेत.

दरम्यान, शनिवारी अनुष रात्री नऊच्या सुमारास घरातून ढोल-ताशा वादनाच्या सरावासाठी बाहेर पडला होता. तो ढोल-ताशा पथकात जात होता. परंतु, वादन करून तो घरी परतला नाही.

त्यामुळे अनुषच्या आईने कोंढवा पोलिसांत बेपत्ता झाल्याचीतक्रार दिली. तो अल्पवयीन असल्याने अपहरणाचा गुन्हा नोंद केला होता. मात्र, दुसऱ्या दिवशी सासवड ( Pune) पोलिसांना दिवे घाटात एक मृतदेह असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी येथे धाव घेतली. त्याच्या फोटोवरून तो अनुष असल्याचे समोर आले. त्याचा खून करण्यात आल्याचे उघड झाल्यानंतर खूनाचा गुन्हा नोंदविला.

चौकशी सुरू असताना कोंढवा पोलिसांना ही बाब समजली. त्यांनी तपास सुरू केल्यानंतर अनुषसोबत त्याचा मित्र देखील तेथे असल्याचे समजले. लागलीच वरिष्ठ निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक संदिप भोसले व संजय मोगले यांनी संबंधित मुलाकडे विचारपूस केली. तेव्हा त्याने घटनेची माहिती दिली.

दिवे घाटात गेल्यानंतर आरोपींनी अनुष व त्याला मारहाण केली. तु पोलिसांना तसेच प्रतिस्पर्धींना माहिती पुरवत असल्यावरून मारहाणकरून खून केल्याचे समजले. कोंढवा पोलिसांनी या तिघांना पकडले. तर, इतरांचा शोध सुरू केला ( Pune) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.