Pune : पत्नीच्या न्यूड फोटोसह फेसबुकवर पोस्ट टाकणाऱ्या पतिविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज- स्वतःच्या पत्नीचे फेसबुक वर न्यूड फोटो टाकून (Pune) माझ्या बायकोला भेटायचे असेल तर लोकेशन वर जा अशी पोस्ट टाकणाऱ्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 35 वर्षीय पत्नीने या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार 40 वर्षीय आरोपी प्रति विरोधात मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : येरवडा कारागृहात कैद्यांची भजन आणि अभंगाची महाअंतिम फेरी

या प्रकरणी अधिक माहिती अशी की आरोपी आणि फिर्यादी हे पती-पत्नी आहेत. आरोपी पतीने फिर्यादी पत्नीचे न्यूड फोटो फेसबुकवर टाकले आणि कोणाला माझ्या बायकोला भेटायचे असेल तर लोकेशन वर जा असे सांगितले. इतकेच नाही तर आरोपीने फिर्यादी आणि तिच्या आईकडून वेळोवेळी सात लाख रुपये घेतले आहेत.

फिर्यादी पत्नीने आरोपीला बाहेरच्या मुली सोबत अफेअर असल्याबाबत विचारले असता पत्नीला शिवीगाळ करत मारहाण केली. मार्केट यार्ड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.