Pune : रिकाम्या टाकीत 20 लाख रुपये टाकून त्याचे पाच कोटी रुपये करुन देतो सांगत भोंदूने केली फसवणूक

एमपीसी न्यूज – वीस लाख रुपयांचे पाच कोटी रुपये (Pune) करण्याच्या आमिषाने एका भोंदूने व्यावसायिकाची 20 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून याप्रकरणी तन्वीर शामकांत पाटील, शिवम गुरुजी, सुनील राठोड, आनंदस्वामी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra : वाघनखे करारावर स्वाक्षरी करण्यासाठी सुधीर मुनगंटीवार आज होणार लंडनला रवाना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला नारायण पेठेत राहायला (Pune)  आहे. महिलेचे व्यावसायिक भागीदार अंकितकुमार पांडे यांची जमीन खरेदी व्यवहारातून आरोपी तन्वीर पाटील याच्याशी ओळख झाली होती.

पाटीलने शिवम गुरुजी, सुनील राठोड, आनंद स्वामी यांच्याशी पांडे यांची ओळख करुन दिली. आरोपींनी पांडे आणि त्यांचे परिचित राजपाल जुनेजा आणि तक्रारदार महिलेला वीस लाख रुपयांचे पाच कोटी रुपये करुन देतो, असे आमिष दाखविले.

13 सप्टेंबर रोजी आरोपी महिलेच्या घरी आले. रिकाम्या टाकीत त्यांनी 20 लाख रुपये टाकण्यास सांगितले. त्यानंतर आरोपींनी खोलीत धूर केला. हरिद्वार येथे जाऊन विधी करावा लागेल, असे आरोपींनी सांगितले.

टाकीतील 20 लाख रुपये घेऊन आरोपी पसार झाले. आरोपींशी महिलेने संपर्क साधला. तेव्हा आरोपींनी प्रतिसाद दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक बहुरे तपास करत (Pune)  आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.