Dighi : अडीच कोटींच्या फसवणूक प्रकरणी बांधकाम व्यवसायिकांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – बांधकाम सुरू असलेल्या दोन इमारतीमध्ये सदनिका (Dighi) देण्याबाबत ॲग्रीमेंट टू सेल करून देत दोन कोटी 52 लाख 30 हजार रुपये घेतले. त्यानंतर ठरलेल्या कालावधीत सदनिकांचा ताबा न देता तसेच घेतलेले पैसे परत न करता ग्राहकांची फसवणूक केली. हा प्रकार सन 2018 ते 25 सप्टेंबर 2023 या कालावधीत चोविसावाडी येथे घडला.

Pune : 1 ऑक्टोबरपासून अनेक रेल्वे गाड्यांच्या वेळा बदलणार

नितीन शंकर धिमधिमे (वय 42, रा. चिंचवड), मकरंद सुधीर पांडे (वय 43, रा. औंध, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या बांधकाम व्यवसायिकांची नावे आहेत. याप्रकरणी राजेंद्र गोविंद सुर्वे (वय 48, रा. भोसरी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फॉर्च्यून वास्तुशिल्प डेव्हलपर्सचे धिमधिमे (Dighi) आणि पांडे यांनी फॉर्च्यून हिलटॉप व फॉर्च्यून वेदाज या बांधकाम योजनेतील चऱ्होली आळंदी रोड चोविसावाडी या बांधकाम योजनेतील सदनिका देतो, असे सांगून 25 ते 30 सदनिका धारकांना एग्रीमेंट टू सेल करून दिले.

Talegaon : कंटेनरच्या धडकेत बापलेकीचा मृत्यू

त्यांच्याकडून आतापर्यंत दोन कोटी 52 लाख 36 हजार रुपये घेतले. चार ते पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटूनही या ठिकाणी प्रकल्पाचे काम पूर्ण झाले नाही.

फिर्यादी आणि अन्य लोकांनी सदनिका घेण्यासाठी दिलेले दोन कोटी 52 लाख 30 हजार रुपये रकमेचा धिमधिमे आणि पांडे यांनी वैयक्तिक फायद्यासाठी वापर करून फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला (Dighi) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.