Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीला 451 मिष्टान्नांचा महानैवेद्य

एमपीसी न्यूज – मिठाई, फराळाच्या तिखट-गोड अशा वेगवेगळ्या (Pune)पदार्थांचा तसेच विविध प्रकारच्या फळांचा व भाज्यांचा महानैवेद्य श्रीमंत दगडूशेठ गणपती समोर दाखविण्यात आला.

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्रीं ना तब्बल 451 प्रकारचे मिष्टान्न अर्पण करण्यात आले होते. लाडक्या बाप्पासमोर मांडलेल्या वेगवेगळ्या पदार्थांचा भव्य अन्नकोट पाहण्याकरिता पुणेकरांनी सकाळपासूनच मोठ्या संख्येने मंदिरात गर्दी केली.

Pimpri : साई चौकातील हुक्का पार्लरवर पिंपरी पोलिसांची कारवाई

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, (Pune)सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये अन्नकोट आयोजित करण्यात आला होता. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, कार्यकर्ते उपस्थित होते.

ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण म्हणाले, त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आयोजित अन्नकोटाकरीता पदार्थ देण्याचे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले होते. त्यानुसार तब्बल 451 हून अधिक प्रकारचे पदार्थ भाविकांकडून मंदिरात गोळा झाले. ते सर्व पदार्थ अन्नकोटामध्ये मांडण्यात आले. या सर्व पदार्थांचा प्रसाद मंदिरातील भक्तांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.