Chinchwad : 26/11 मधील शहीद जवानांना मानवंदना देण्यासाठी चिंचवड ते गेट ऑफ इंडिया सायकल प्रवास

एमपीसी न्यूज -चिंचवड येथील सायकल प्रेमींनी 26/11मधील शहीद जवानांना (Chinchwad)गेट वे ऑफ इंडिया पर्यंत सायकलवर प्रवास करून आज (रविवारी) सकाळी मानवंदना दिली.

चिंचवड येथील इको पेडलर्स ग्रुप, हंटर्स ट्रेकिंग आणि सोशल क्लब ग्रुपच्या वतीने या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अकलूज येथील रॉयल रायडर्स ग्रुपचे देखील त्यांना सहकार्य लाभले.

Pune : माझ्यासाठी नाटकांची परिभाषा वेगळी – वामन केंद्रे

या उपक्रमाचे यंदाचे हे चौथे वर्ष आहे. चिंचवड येथील (Chinchwad)चापेकर पुतळ्यापासून शनिवारी (ता.२५) रात्री नऊ वाजता ज्येष्ठ सायकल पटूंनी हिरवा झेंडा फडकावला. ५७ पुरुष, ४ महिलांनी या सायकल प्रवासामध्ये भाग घेतला होता. आज (रविवारी ) पहाटे सहा वाजता हे सर्व सायकलपटू गेट ऑफ इंडिया जवळ पोहोचले.

या ठिकाणी उभारण्यात आलेल्या शहीद जवानांच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण करत “भारत माता की जय” असा नारा देत सर्वांनी भारताच्या एकात्मतेची वज्रमुठ बांधून राष्ट्रगीत गायले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.