Pune : पवना आणि मुळा नदीकिनारी आढळला देखणा दुर्मिळ इंडीयन विलो

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवडचे वनस्पती (Pune) अभ्यासक प्रा. किशोर सस्ते यांना मुळा आणि पवना येथील नदी किनारी दुर्मिळ असा वाळुंज वृक्ष आढळून आला आहे. याचे वानसशास्त्रीय नाव सॅलिक्स टेट्रास्पर्मा असून पाने अरुंद अंडाकृती आकाराची असून ती टोकाला निमुळती होत जातात. फुले लोंबकळत्या घोसात, निलंबशुकी पुष्पसंभारात येतात. एका बाजूने हिरवी तर दुसऱ्या बाजूने चंदेरी रंगाची पाने आणि पिवळा फुलोरा सौंदर्यात भर घालतो.

रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट योजनेंतर्गत मुळा नदीकाठच्या 350 झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. या धर्तीवर या वृक्षांचे संगोपन आणि संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. या झाडास संस्कृत मध्ये ‘जलवेतस’ असे देखील म्हणतात. नदीकाठची धुप थांबवण्यासाठी या वृक्षांचे योगदान महत्त्वाचे आहे. हा वृक्ष औषधी असुन सॅलीसायकल्कीक आम्ल आणि अस्पेरीन चा स्त्रोत आहे. त्वचा रोग, कर्करोग,ताप आणि सांधेवात या आजारवर उपयुक्त आहे असेही त्यांनी सांगितले. पिंपळे गुरव, चिंचवड,वाकडच्या मुळा नदीकिनारी आणि मुळा आणि पवना नदीच्या संगमापासून पुढे त्यांना हा वृक्ष आढळला आहे. पुण्यातील मुठा नदी किनारी गरवारे महाविद्यालयाजवळ हा एकमेव‌ दुर्मिळ वृक्ष आहे.

PCMC : हरित वारी निमित्त महापालिका करणार 1 लाख बियांची 5 हजार पाकिटे वाटप

“वनस्पती अभ्यासक डॉ.अलेक्झांडर गिब्सन यांच्या दापोडी (Pune) बागेतील झाडांच्या पुस्तकात देखील या वृक्षाचा उल्लेख आहे. ते बॉम्बे प्रेसिडेन्सी आणि महाराष्ट्रातील पहिले मुख्य वनसंरक्षक होते. पूर्वी नदीकिनारी हमखास आढळणारा देखणा वाळुंज वृक्ष, आता नदीपात्रात अतिक्रमणामुळे पिंपरी चिंचवड परीसरातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. मुळा नदीच्या काठावर वृक्षतोड होणार आहे या दृष्टीने हा वृक्ष महत्त्वाचा आहे.

नर आणि मादी असे दोन‌वेगवेळे वृक्ष लांब अंतरावर असतात, त्यामुळे परागीभवन होऊन वृक्षांचे बीयांमार्फत पुनरुत्पादन खूप कमी होते. या वृक्षांचे शाखीय प्रजनन वेगाने होते”, असे प्रतिपादन किशोर सस्ते यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.