Pune : सिंहगडावर पर्यटनासाठी आलेल्या तरुण-तरुणीवर कोयत्याने हल्ला

एमपीसी न्यूज-सिंहगड किल्ल्यावर पर्यटनासाठी आलेल्या (Pune) एका तरुण तरुणीवर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला. तरुणीच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने काढून घेऊन हल्लेखोर पसार झाले. सिंहगड किल्ल्याच्या आतकरवाडी येथून जाणाऱ्या रस्त्यावर रविवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेमुळे सिंहगड किल्ल्यावर पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
याप्रकरणी विवेक कुमार बाबुलाल प्रसाद (वय 28) या तरुणाने तक्रार दिली आहे. त्यानुसार हवेली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोप विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत फिर्यादी जखमी झाला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की फिर्यादी विवेक कुमार आणि त्याची मैत्रीण सिंहगड किल्ल्यावरून खाली येत होते. यादरम्यान एका झुडपात दबा धरून बसलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांना अडवले. त्यातील एकाने फिर्यादीच्या मैत्रिणीच्या गळ्यातील सोनू साखळी हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. यावर फिर्यादीने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याच्यावर कोयत्याने वार केले. यानंतर फिर्यादी आणि त्याच्या मैत्रिणीने आरडाओरडा केला असता दोघेही हल्लेखोर पसार झाले. हवेली पोलीस (Pune) अज्ञात आरोपीचा शोध घेत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.