Talegaon : शाळांवरील धार्मिक निर्बंध हटवावेत, प्रदीप नाईक यांची शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे मागणी

एमपीसी न्यूज – ख्रिश्चन व अन्य समुदायातील शाळांमध्ये जे निर्बंध लावले (Talegaon ) जातात त्यांच्यावर त्वरीत कारवाई करावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे महाराष्ट्र राज्य कार्यकरणी  सदस्य प्रदिप नाईक यांनी राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Pune : सिंहगडावर पर्यटनासाठी आलेल्या तरुण-तरुणीवर कोयत्याने हल्ला

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, ख्रिश्चन मिशनरी शाळा किंवा इतर समाजांच्या शाळांमध्ये त्यांचा धर्म वाढविण्यासाठी वेगळ्या प्रार्थना शिकवल्या जातात. तेथे कोणताही सर्वधर्म समभाव शिकवला जात नाही. शाळांमध्ये केवळ आपला धर्म कसा वाढेल याच्याकडे कल असतो. तळेगाव दाभाडे येथील माऊंट सेंट अन्ट स्कूल हि मुलींना कुठल्याही पद्धतीची टिकली लावू देत नाही. हिंदू परंपरेनुसार केल्या जाणाऱ्या अनेक बाबींना या शाळा विरोध करतात. अशा अनेक शाळा आहेत ज्या हिंदू धर्म परंपरेला विरोध करतात.

त्यामुळे राज्य शासनाने त्यांच्या माध्यमातून सर्व धर्मसमभाव राखण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत. यासाठी शाळांमध्ये विशीष्ठ धर्माची प्रार्थना न ठेवता राष्ट्रगीत, संविधान अशी गिते प्रार्थना म्हणून वापराव्यात. येणार्या तरुण पिढीवर कोण्या एका धर्माचा पगडा न राहता आपल्या देशा विषयी आदर कर्तव्य राखणे शिकवणे गरजेचे आहे. आपण जनतेला या बाबतीत न्या द्याल अशी विनंतीही (Talegaon ) या निवेदनातून करण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.