Pune : कल्याणीनगर येथे नदीच्या मधोमध अडकलेल्या तरुणाचे अग्निशमन दलाने वाचवले प्राण

एमपीसी न्यूज- आज (दि. 13 )सकाळी 9 वाजता  एका तरुणाने कल्याणी नगर (Pune) येथील पुलावरून नदीत उडी मारल्याची वर्दि बी.टी.कवडे रोड व हडपसर अग्निशमन दल नियंत्रण कक्षाला मिळाली. घटनेचे गांभिर्य ओळखून येथील अग्निशमन वाहने ताबडतोब  घटनास्थळी रवाना  झाले.

Maval : किशोर आवारे यांच्या हत्येप्रकरणी सुनील शेळके म्हणाले….

घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, एक तरुण नदीच्या मधोमध जलपर्णी व एका झाडाचा आसरा घेऊन पाण्यात अडकला आहे. त्याचवेळी जवानांनी तत्परतेने नदीमधे रस्सी , लाईफ जॅकेट व लाईफ रिंगच्या साह्याने पाण्यात उतरून मधोमध अडकलेल्या तरुणाकडे जाऊन त्याला धीर देत त्याच्याशी संवाद साधून त्याला लाईफ जॅकेट व लाईफ (Pune) रिंग देत सुमारे 30 मिनिटात सुखरुप पाण्याबाहेर काढले.

तरुणाचे नाव समजू शकले नसून वय अंदाजे 25 वर्ष आहे. तसेच तरुणाला काही प्रमाणात दुखापत झाल्याने शासकीय रुग्णवाहिका 108 मधून दवाखान्यात पाठविण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून पुढील तपास करीत (Pune) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.