Kharalwadi : खराळवाडी येथे रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य

एमपीसी न्यूज – खराळवाडी येथील  (Kharalwadi )मुख्य रस्त्याच्या लगत असणारे गटार स्वच्छ केल्यावर गटारातील केर कचरा रस्त्यावर टाकला आहे.त्यामुळे परिसर अस्वच्छ दिसत आहे. तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. याचा त्रास दुचाकी, पादचारी नागरिकांना होत आहे.

या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात दुचाकी आणि चारचाकी, अवजड वाहनांची वर्दळ सुरू असते. ही वाहने या रस्त्यावरून ये जा करत असताना कचरा संपूर्ण परिसरभर पसरत आहे.
गटारातील घाण पाणी देखील परिसरात पसरले आहे. कचऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात ओला कचरा  (Kharalwadi )असल्याने दुर्गंधी निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.