Nigdi : प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघातर्फे परिचारिकांचा सन्मान

एमपीसी न्यूज – निगडी प्राधिकरण  ज्येष्ठ नागरिक (Nigdi) संघाच्या दादा दादी विरंगुळा केंद्राच्या सभागृहात जागतिक परिचारिका दिनानिमित्त सदस्य ज्येष्ठ परिचारिका यांचा सत्कार करण्यात आला.

Karnataka Election Result : कर्नाटक काँग्रेसच्या विजयात पिंपरी-चिंचवडमधील ‘या’ महिला नेत्यांचा  वाटा..

यावेळी बेळगावकर, शोभना जोशी, माधुरी वैद्य डिसोजा, आशा नष्टे यांनी परिचारिका म्हणून काम करताना आलेले आपले अनुभव सांगितले.
अध्यक्ष म्हणून इंगोले, म्हेत्रे आणि संघाच्या अध्यक्षा अर्चना वर्टीकर होत्या. प्रेक्षकांमध्ये सुभाष जोशी, चंद्रशेखर जोशी, चाँदबी सय्यद,मुक्त पत्रकार बाबू डिसोजा यांची प्रमुख उपस्थिती होती. आनंदराव मुळूक यांनी सूत्रसंचालन केले. डॉ.रजनी जैन यांनी (Nigdi) आभारप्रदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.