Nigdi Crime : पॅन नंबर व बँक खाते क्रमांकाचा वापर करून परस्पर काढले साडे तीन लाखांचे कर्ज

एमपीसी न्यूज – आपल्या बँक खात्याचे किंवा पॅन कार्ड, एटीएम कार्ड यांची माहिती चुकून हि कोणाला देऊ नका अशी जनजागृती पोलीस व आरबीआय कडून सतत होत असते. तरीही नागरिकांकडून विविध आमिषाद्वारे किंवा कामा निमीत्त अनेकवेळा ही माहिती शेअर होते. याचाच गैरफायदा घेऊन एका नागरिकाच्या केवळ बँक खाते क्रमांक व पॅन क्रमांकावरून एकाने परस्पर सुमारे साडे तीन लाखांचे पर्सनल लोन काढत फसवणूक(Nigdi Crime) केली आहे.

हा प्रकार फेब्रुवारी 2023 ते 12 मे 2023 या कालावधीत रुपीनगर येथे घडला असून याप्रकरणी शकील जमील सगरीवय (वय 36 रा. रुपीनगर) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात दोन इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Talegaon : किशोर आवारे हत्या प्रकरणातील आरोपी सापडले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या एचएडीएफसी बँकचा खात्याचा ग्राहक क्रमांक व पॅन कार्डचा वापर करत एनाळखी इसमाने फिर्यादीच्या नावे बँक, बजाज फायनान्स, आदित्य बिर्ला फायनान्स क्राव्हा क्रपिटल अशा विविध फायनान्स कंपनी,. बँक यांच्याकडून 3 लाख 52 हजार 819 रुपयांचे पर्सनल लोन काढले. यावरून चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील(Nigdi Crime) तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.