Pune : पुण्यातील मारीगोल्ड आयटी पार्कला आग, गच्चीवर अडकलेल्या चौघांची सुखरूप सुटका

एमपीसी न्यूज – पुण्यातील कल्याणीनगर य़ेथील (Pune) मारीगोल्ड आयटी पार्क येथे आज (सोमवारी) दुपारी बाराच्या सुमारास आग लागली. घटनेची वर्दी मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले असून आयटी पार्कमधील कर्मचाऱ्यांची जवानांनी सुटका केली.

या बचाव कार्यासाठी अग्निशमन दलाकडून उंच शिडीची ब्रॉन्टो व इतर चार अग्निशमन वाहने दाखल झालेली आहेत. इमारतीत गच्चीवर अडकलेल्या 4 नागरिकांची सुटका करण्यात आली. बिल्डींगमधून मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याचे लक्षात आल्यानंतर अग्निशमन दलाला या घटनेची माहिती देण्यात आली.

Chakan Market : कांद्याच्या भावात वाढ; हिरवी मिरची, वाटाणा व लसणाचे भाव तेजीत

इमारतीच्या गच्चीवर चौघे जण अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर (Pune) जवानांनी उंच शिडीचा वापर करुन त्यांना सुखरुप खाली आणले. तासाभरानंतर आग आटोक्यात आणली. आग लागल्यानंतर आयटी पार्क परिसरात बघ्यांची गर्दी झाली होती.

दलाच्या जवानांनी अग्निशमन दलाकडील उंच शिडीचे वाहन ब्रॉन्टोचा वापर करत कर्मचाऱ्यांना धीर देत एकूण 50 कर्मचाऱ्यांना सुखरुप बाहेर आणले. यादरम्यान अग्निशमन दलाचे अधिकारी कैलास शिंदे व तांडेल शफीक सय्यद हे काही प्रमाणात जखमी झाले, तर आयटी पार्कचे दोन कर्मचारीही किरकोळ स्वरूपात जखमी झाले. शासकीय रुगणवाहिका क्रमांक 108 च्या सात   रुग्णवाहिका दाखल झाल्या होत्या.

आयटी पार्कमधील काही महिला कर्मचारी वर्ग व आयटीचे मॅनेजर यांनी दलाचे प्रमुख असलेले देवेंद्र पोटफोडे यांचे व जवानांनी तत्परतेने केलेली कार्यवाही आणि 50 अडकलेल्या कर्मचाऱ्यांना सुखरुप बाहेर काढल्याबद्दल त्यांचे व दलाचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.