Pune : ACB News : केलेल्या मदतीचा मोबदला म्हणून उपनिरीक्षकाने मागितली 50 हजारांची लाच

एमपीसी न्यूज – एका व्यक्तीची कार त्याच्या चालकाने परस्पर (Pune) नेली. चालकाकडून कार परत मिळवून देण्यासाठी मदतीचा मोबदला म्हणून पोलीस उपनिरीक्षकाने 50 हजारांची लाच मागितली. हा प्रकार 25 जानेवारी रोजी घडला असून त्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागा (एसीबी) कडून चौकशी करून पाच एप्रिल रोजी संबंधित पोलीस उपनिरीक्षकावर लाच मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शशिकांत नारायण पवार असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. या प्रकरणी 22 वर्षीय व्यक्तीने एसीबीकडे तक्रार केली आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यक्तीकडे इर्टिगा कार आहे. त्यांची कार, कारवरील बदली चालकाने परस्पर कर्नाटक येथे नेली.

चालकाच्या ताब्यातून कार सोडवून आणण्यासाठी तक्रारदाराने पोलिसात धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक शशिकांत पवार हे सिंहगड रोड पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत. पोलीस उपनिरीक्षक पवार यांनी तक्रारदार व्यक्तीकडे कार सोडवून त्यांना मदत करण्यासाठी मदतीचा मोबदला म्हणून 50 हजार रुपयांची मागणी केली.

त्यानुसार तक्रारदार व्यक्तीने थेट एसीबी कडे तक्रार केली. या प्रकरणामध्ये 25 जानेवारी रोजी एसीबीने लाच मागणीबाबत पडताळणी केली. त्यानंतर शशिकांत पवार यांना पाच एप्रिल रोजी लाच मागणीबाबत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. एसीबी पुणे येथील पोलीस उपअधीक्षक विजय माला पवार तपास करीत आहेत.

Maharashtra Sand Rate : वाळूचे लिलाव बंद; 600 रुपये प्रति ब्रासप्रमाणे डेपोतून मिळणार वाळू

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.