Pune : 9 निष्पाप नागरिकांना चिरडणाऱ्या संतोष मानेला फाशी ऐवजी जन्मठेप 

एमपीसी न्यूज – माथेफिरू संतोष मानेची फाशीची शिक्षा रद्द करत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 25 जानेवारी 2012 मध्ये संतोष माने या एस. टी चालकाने बेभान गाडी चालवून 9 निष्पाप जीवांना चिरडले होते.

काय होती नेमकी घटना?

पुणे एस.टी.महामंडळ आगारात संतोष माने चालक म्हणून नोकरीस होता . 25 जानेवारी 2012 च्या दिवशी संतोष माने याने स्वारगेट आगारातून एस.टी.बस बाहेर काढली. संतोष हा मनोरुग्ण होता. त्याने त्या दिवशी बेदरकारपणे बस चालवून 9 जणांचे बळी घेतले, तसेच 37 जण जखमी झाले होते.

8 एप्रिल 2013 मध्ये चालक संतोष मानेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. ही शिक्षा पुन्हा 20 सप्टेंबर 2013 मध्ये रद्द करण्यात आली. त्यानंतर पुन्हा आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली.

या निकालाविरुद्ध आरोपीने वकिलामार्फत अपील दाखल केले. त्यानंतर 24 डिसेंबर 2018 ला येरवडा जेलमध्ये आरोपीची भेट घेऊन त्याची मानसिक स्थिती जाणून घेतल्यानंतर त्याच्या मानसिक स्थितीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला. यावर सुनावणी करत न्यायालयाने आरोपी संतोष मानेची फाशी रद्द करत त्याला जन्मठेप सुनावली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.