Pune : कात्रज गावठाण येथील खेळाच्या मैदानाच्या आरक्षणा संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान – विजय कुंभार

एमपीसी न्यूज – कात्रज गावठाण येथील खेळाच्या मैदानाचे आरक्षण रद्द करून ही जागा पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला ( कात्रज डेअरी ) देण्याचा हालचाली सुरू ( Pune ) आहेत. मात्र, या हालचाली सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे अवमान करणा-या आहेत, असे महाराष्ट्र आम आदमी पार्टीचे उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी म्हटले आहे. त्यासंदर्भातील निवेदन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना देण्यात आले आहे.

कात्रज येथील सर्वे क्रमांक 132  (पार्ट) ते 133 (पार्ट) या जागेवर महापालिकेच्या विकास आराखड्यात (डीपी) खेळाच्या मैदानाचे आरक्षण टाकण्यात आले आहे. पण, पुणे महापालिकेच्या शहर सुधारणा समितीने  मैदानाचे आरक्षण बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर ही जागा कात्रज डेअरीला दिली जाणार आहे. मुळातच पुण्यात आरक्षणाचा मोठा अनुशेष आहे. त्यातच विकास आराखडा करताना आरक्षणाची मानके कमी केल्यामुळे आरक्षणांची संख्या आणखी कमी झाली आहे.

Pimpri : स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन 

मुलांना खेळाची मैदाने नाहीत. जी आहे त्याच्यावर अतिक्रमण झालेलं आहे. अशा स्थितीमध्ये असलेलं आरक्षण वगळून तिथं काहीतरी नवीन करणे हे पूर्णतः चुकीचं आहे.अगदी सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा आरक्षणाच महत्व आणि ती कशी जपावीत, त्यासाठी काय करावं यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे आखुन दिलेली आहेत. (जनहित याचिका 4433/1998 यामध्ये सर्वोच्च न्यायालय अपील क्रमांक 198 -199 /2000 ). गिरिश व्यास प्रकरणात  सर्वोच्च न्यायालयाने तत्कालिन मुख्यमंत्री ,पालिका आणि राज्य शासनाच्या अधिका-यांवर गंभिर ताशेरे ओढून आरक्षणे वगळताना किंवा बदलताना विशेषत: अशी आरक्षणे जर मुलांच्या भवितव्याशी संबधित असतील तर काय काळजी घ्यावी, याबाबत सविस्तर आदेश दिले होते.

कात्रज येथील  क्रिडांगणावरील आरक्षण बदलाचा प्रस्ताव स्थगीत करून या जागेचा क्रिडांगणा व्यतिरिक्त इतर कोणत्याही
कारणासाठी वापर केला जाऊ नये याची काळजी आपण घ्यावी. अन्यथा सर्वोच्च न्यायालयाच्या  आदेशाचा अवमान केल्याबद्दल आम्हाला संबधित सर्वांविरुद्ध योग्य त्या न्यायिक प्राधिकरणात दाद मागावी लागेल याची नोंद घ्यावी, असेही कुंभार यांनी निवेदनात ( Pune ) म्हटले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.