Satyashodhak Movie : ‘सत्यशोधक’ चित्रपटाला करसवलत मिळणार ?

एमपीसी न्यूज – महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले (Satyashodhak Movie)यांच्या जीवनावर आधारित बनवण्यात आलेल्या ‘सत्यशोधक’ चित्रपटाला कर सवलत देण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
देशात स्त्रीशिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणारे, बहुजनांसाठी शिक्षणाची दारे खुले करणारे, सत्यशोधक विचारांचे महामानव क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत ‘सत्यशोधक’ चित्रपटाला करसवलत देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेत यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (दि. 8) मंत्रालयात आयोजित बैठकीत दिल्या.
चित्रपटांवर आकारण्यात येणाऱ्या 18 टक्के जीएसटीपैकी प्रत्येकी(Satyashodhak Movie) 9 टक्के रक्कम केंद्र आणि राज्य शासनाला मिळत असते. राज्याच्या वाट्याला येणाऱ्या रकमेची करसवलत देण्याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात येणार आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचे कार्य अलौकिक असून ते भावी पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी हा चित्रपट सहाय्यभूत ठरणार असल्याने चित्रपटाला करसवलत दिली पाहिजे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, वित्त, महसूल व सांस्कृतिक कार्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

https://www.youtube.com/watch?v=yiL5tv7B0bU&t=3s&ab_channel=MPCNews

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.