Pimpri : स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन 

एमपीसी न्यूज – शरद नगर चिखली येथील स्वामी विवेकानंद(Pimpri) यांच्या 161  व्या जयंतीनिमित्त, स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने  तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यातआले आहे. ही व्याख्यानमाला  दिनांक 10 जानेवारी ते 12 जानेवारी 2023 या कालावधीत सायंकाळी 7 वा.  स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठान शरद नगर, स्पाईन रोड सेक्टर-19 चिखली या ठिकाणी होईल.
या व्याख्यानमालेत पहिल्या दिवशी साहित्यिक डॉ संजय गोर्डे हे ” जीवन एक आनंदयात्रा” यांच्याविषयी व्याख्यान देणार आहे. यावेळी माजी नगरसेविका मंगला कदम,योगिता नागरगोजे, भगवान पठारे, फ प्रभागाधिकारी सीताराम भवरे,निलेश नेवाळे,राजेंद्र घावटे हे उपस्थित राहणार आहेत.
दुसऱ्या दिवशी दि.11रोजी ” तरुणाईचे  आव्हाने आणि जबाबदारी  “या विषयावर  युवा व्याख्याते राहुल गिरी यांचे व्याख्यान होईल.यावेळी माजी नगरसेवक संजय नेवाळे, नामदेव ढाके, राजाभाऊ गोलांडे ,सचिन सानप , अजय पाताडे आदी उपस्थित राहणार आहेत.

दिनांक 11 रोजी यावेळी कृष्णा नगर येथील मयूर हॉस्पिटलमध्ये स 10 वा.  रोटरी क्लबच्या सहकार्याने  मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर होणार आहे.तिसऱ्या दिवशी दि .12 तारखेला स्वामीजींच्या जयंती दिवशी साहित्यिक कृष्णांत खोत हे ” वर्तमानाचा भोवरा” याविषयावर व्याख्यान देतील.स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी  स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार, भक्त पुंडलिक , जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

 

Pune: महाविकास आघाडीचे उद्या आंदोलन

यावेळी आमदार महेश लांडगे, माजी नगरसेवक एकनाथ पवार, भंडारा डोंगर ट्रस्टचर्चा अध्यक्ष बाळासाहेब कशीद, उपनिबंधक नितीन काळे  आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.या गेली अनेक वर्षापासून अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून विवेकानंदांचे विचार समाजामध्ये रुजवण्यासाठी प्रतिष्ठान प्रयत्न करीत असल्याची माहिती स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठानचे रामराजे बेंबडे यांनी दिली.
कार्यक्रम आयोजनासाठी सुनील पंडित, मिलिंद वेल्हाळ, महेश मांडवकर, संतोष ठाकुर, शंकरराव बनकर, पंढरीनाथ  म्हस्के, सुनील खंडाळकर, देवराम मेदनकर, दिलीप मांडवकर,अशोक हड़के यांनी पुढाकार (Pimpri) घेतला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.