Pune: महाविकास आघाडीचे उद्या आंदोलन

एमपीसी न्यूज – कात्रज येथील क्रीडागंणाचे आरक्षण उठवून दूध डेअरी व प्रक्रियेसाठी आरक्षण टाकणार(Pune) असल्याच्या निषेधार्थ, पुण्याचे पालकमंत्री व पुणे महानगरपालिका आयुक्त यांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे.

उद्या (मंगळवार दि. 9जानेवारी 2024रोजी) सकाळी 11.०० वा., पुणे महानगरपालिकेसमोर हे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रशांत जगताप, शहर प्रमुख (उध्दव ठाकरे गट) संजय मोरे आणि गजानन थरकुडे यांनी दिली.

Pune : समाजापुढील आजची आव्हाने वाढणे चिंताजनक परिसंवादातील सूर

कात्रज येथील स.नं. 132 (पार्ट) ते 133 (पार्ट) या पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक (Pune)संघाच्या संस्थेच्या लगतच्या सुमारे 3.59 हेक्टर (साधारणत: 7 एकर) जागेवर विकास आराखड्यामध्ये खेळाच्या मैदानाचे आरक्षण रद्द करून ती जागा दूध डेअरी व प्रक्रिया या कारणासाठी आरक्षित करण्याबाबतच्या प्रस्तावास पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा तीव्र विरोध व लेखी हरकत आहे, असे निवेदन पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी दिले आहे.

कात्रज येथील स.नं. 132 (पार्ट) ते 133 (पार्ट) या पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संस्थेच्या लगतच्या सुमारे 3.59 हेक्टर (साधारणत: 7 एकर) जागेवर विकास आराखड्यामध्ये खेळाच्या मैदानाचे आरक्षण आहे.

हे आरक्षण काढून ती जागा दूध डेअरी व प्रक्रिया या कारणासाठी आरक्षित करण्याबाबत प्रस्ताव शासन व मनपा स्तरावर कार्यवाही सुरू आहे. तसेच सदर आरक्षणाकरिता पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला समुचित प्राधिकरण म्हणून नियुक्त करण्यात यावे ही बाब देखील प्रस्तावात नमुद केली आहे.या प्रस्तावानुसार या आरक्षण बदलावर हरकती व सूचना मागविण्यात आलेल्या आहेत.

या प्रस्तावास काँग्रेस पक्षाची तीव्र हरकत व विरोध आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.