Pune : समाजापुढील आजची आव्हाने वाढणे चिंताजनक परिसंवादातील सूर

एमपीसी न्यूज – समाजापुढील आजची आव्हाने वाढणे चिंताजनक (Pune)असल्याचा सूर व्यक्त करण्यात आला. पुणे महानगरपालिका मराठी भाषा संवर्धन समिती साहित्यिक कट्टा वारजेतर्फे एक दिवसीय मराठी साहित्य संमेलनात ”समाजापुढील आजची आव्हाने आणि मार्ग” परिसंवाद आयोजित केला होता.

मेंदू आणि शिक्षण अभ्यासक श्रुती पानसे, सुप्रसिद्ध साहित्यिक (नांदेड) डॉ. केशव देशमुख, म. सा. प. पुणे कार्यवाह वि. दा. पिंगळे यांनी त्यामध्ये सहभाग घेतला. स्वागताध्यक्ष बाबा धुमाळ, पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली प्रदीप धुमाळ उपस्थित होत्या.

डॉ. केशव देशमुख म्हणाले, शिक्षण नावाचे क्षेत्र (Pune)महत्वपूर्ण आहे. इंग्रजी शिक्षण जगण्यासाठी महत्वपूर्ण नाही. व्यसनाबद्दल पराकोटीची चर्चा होते. तरुणपणात व्यसनाधीनता वाढत आहे. माणसापेक्षा पैसा, लोभ मोठा वाटत आहे. सत्यमेव जयते केवळ मनातच उरलेले आहेत. शहरात आजी, आजोबा, मावशी दिसत नाही. आव्हानापेक्षा आत्मपरीक्षण महत्वाचे आहे. कितीतरी आव्हाने आहेत. पी. साईनाथ यांनी महाराष्ट्र ही शेतकऱ्यांची स्मशानभूमी असल्याचे म्हटले आहे.

स्त्रीयावरील अत्याचार कमी होत नाही. धैर्य महत्वपूर्ण आहे. स्त्री मुक्तपणे वावरली पाहिजे. जर्मनीत, आसट्रेलियामध्ये स्त्रिया 24 तास वावरतात. तसे चित्र आपल्या देशात दिसून येत नाही.

दारूबंदी ही उत्पन्न धरून विचार करून चालणार नाही. स्त्रियांवरील अत्याचार थांबणे आवश्यक आहे. सत्यमेव जयते, विचार स्वतःपासून करावा लागणार आहे. आज आपल्याकडे आरोग्यभान राहिलेले नाही. मोबाईल बद्दल विचार करावे लागणार आहे. आठवडाभर तरी मोबाईल बंद ठेऊन बघा. मोबाईल उपहास करून बघा. तो वेळ विपश्यना, प्रार्थनेत घालवा. संवाद हरवत चालला आहे. शिक्षण आणि व्यवसाय वाढत आहे. आज साने गुरुजी कुठे आहेत, केवळ नाणेगुरुजी शिल्लक आहेत. प्रचंड आव्हाने आहेत. त्या सोडविणे महत्वपूर्ण आहे.

PCMC : ड्रेनेज लाईन दुरूस्त करा; नागरिकांची जनसंवाद सभेत मागणी

श्रुती पानसे म्हणाल्या, मी सुरुवात पत्रकारितेपासून केली. माझ्या पिढीला आज वाहतूक कोंडी दिसते, ते माझ्या मुलीला समस्या वाटत नाही. समाजापुढील आव्हाने न संपणारी आहेत. समाजातील मोठमोठे प्रश्न यावर विचार करणे गरजेचे आहे. तरुण, जेष्ठ पिढी गोंधळलेली आहे. चेंगळं करण्यासाठी काही मुले चोरी करीत आहेत. कुठे थांबायचे आणि काय करायचे यावर निर्णय होत नाही.

यापूर्वी 7 वीच्या मुलाला असलेला ताण आज साडेतीन वर्षांच्या मुलावर प्रचंड वाढतोय. आजच्या काळात काही करा पण मुलांना इंग्रजी शिकवा, हा विकृतपणा आहे. यामध्ये मुलाचे बालपण हरविले जात आहेत. साडे तीन वर्षांच्या मुलाला लेखन, वाचन शिकवू नका. त्यांच्या डोळ्यातील बाहुल्या स्थिर झाले नाहीत. आज 5 वर्षांच्या मुलाला ताण येत असल्याचे सांगण्यात येते, ते खरं आहे. 1 मुलाला जरी आपण बाहेर काढले तरी समाजापुढील आव्हाने पेलण्यासारखे होईल.

वि. दा. पिंगळे म्हणाले, 75 वर्षे झाले पण देशातील प्रश्न सुटले नाहीत. मराठवाड्यात चार किलोमीटर हंड्यासाठी पायी जावे लागणे, हा स्वातंत्र्यचा अवमान आहे. आजही हुंडा घेतला जातो. अजूनही सातपुडा पर्वतामध्ये रेल्वे माहिती नाही. एकीकडे पाणी पोहोचत नाही. तर, दुसरीकडे बिस्लरी दिसते. हा विरोधाभास आहे. माणूस वाऱ्यावर सोडलेला आहे. सकाळी राहिलेला शिक्षक सायंकाळी राहणार की नाही, याची खात्री राहिलेली नाही. मुलांना हात लावता येत नाही. पंडित जवाहरलाल नेहरू ते नरेंद्र मोदी यांच्या काळात देश प्रगतीपथावर गेला. मात्र, दुसऱ्या बाजूला बलात्कार, खून थांबत नाहीत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.