Pune : 7 जुलै नंतर पाऊस जोर धरणार, हवामान खात्याचा अंदाज

एमपीसी न्यूज –  मान्सून ने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असला तरी जून महिन्यात मात्र सरासरीच्या (Pune) केवळ 10 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे जोरदार पाऊस कधी पडणार याकडे महाराष्ट्रातील बऱ्याच भागाचे लक्ष आहे. पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी, दक्षिण भारत, ईशान्य भारतात जूनच्या शेवटच्या आठवडय़ात चांगला पाऊस झाला आहे. तरीही किनारपट्टीवर पडलेला पाऊस जून महिन्याच्या सरासरीपेक्षा कमीच आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाचा जोर दोन दिवसांत कमी होईल. त्यानंतर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन पावसाला पोषक स्थिती तयार होईल. साधारण 7 जुलैनंतर पावसाचा जोर वाढण्याची अपेक्षा आहे, असे भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले.

Vadgaon Maval : विद्यार्थ्यांना ऑफ लाईन पद्धतीने दाखले द्या – आमदार सुनिल शेळके

महाराष्ट्रापासून केरळ किनारपट्टीपर्यंत तयार झालेला कमी दाबाचा पट्टा कायम आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस कोकण आणि गोव्याला ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. पुढील पाच दिवस किनारपट्टीवरील अन्य जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. घाटमाथा, मध्य महाराष्ट्रात ही मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडय़ात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पुण्यातही समाधानकारक पाऊस नाही

पुण्यात 1 जून पासून 83.9 मिमी पावसाची नोंद झाली असून सर्वाधीक नोंद ही पाषाण परिसरात 104.3 मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरण परिसरात काल शुक्रवार) पासून पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात शहराची पाणी कपात बंद होईल असे प्रशासनाने सांगितले आहे. याबरबरच आज (दि.1) ते 7 जुलै पर्यंत शङर व आसपासच्या भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात (Pune) आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.