Dehu Road : आषाढी एकादशी निमित्त ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरातील टेकडीवर देवराईतर्फे वृक्षारोपण

एमपीसी न्यूज –  आषाढी एकादशी निमित्त गुरुवारी (दि.29) देहुरोड येथील ऑर्डनन्स फॅक्टरीच्या (Dehu Road) परिसरातील टेकडीवर देवराई निर्मिती साठी वृक्षारोपण करण्यात आले. देवराई फौंडेशनने उपलब्ध करून दिलेल्या देशी रोपांपैकी जवळपास 350 रोपे लावण्यात आली. त्याच बरोबर 200 पेक्षा जास्त बिज गोळे व इतर बियांचे बीजारोपण करण्यात आले.

या उपक्रमात ऑर्डनन्स फॅक्टरी, देहुरोड – स्टाफ, विजयशेठ जगताप योगा मित्र मंडळ, पिंपळे गुरव, JSPM संस्थेचे शाहू कॉलेज स्टाफ व विद्यार्थी, देहुरोड डॉक्टर असोसिएशन व देवराई फौंडेशन, पुणे यांनी सहभाग घेतला होता. तर कार्यक्रमाचे संयोजन  स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, निसर्ग मित्र विभाग यांनी केले होते.

Pune : 7 जुलै नंतर पाऊस जोर धरणार, हवामान खात्याचा अंदाज

प्रकल्पाची संकल्पना डॉ.रमेशजी बन्सल यांनी मांडली. ऑर्डनन्स फॅक्टरी च्या सिनियर जनरल मॅनेजर संजीव. गुप्ता,  जॉईंट जनरल मॅनेजर गौरव मालवीय, अखिलेश कुमार व ईतर 15 पेक्षा जास्त अधिकारी वर्गाच्या सहमती व सहकाऱ्यामुळे तसेच निसर्ग मित्र विभागाचे कार्याध्यक्ष भास्कर रिकामे व सचिव विजय सातपुते यांचे समन्वयाचे काम व देहूरोडचे कैलास पानसरे यांचे सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला.

सकाळी साडेसात च्या  सुमारास डॉ बन्सल यानी प्रास्ताविक करून फॅक्टरी अधिकार्यांची व सहभागी संस्थाची ओळख करून दिली. रघुनाथ ढोले (देवराई फाऊंडेशन) व धनंजय शेडबाळे (अध्यक्ष निसर्ग मित्र) यांनी देवराई संकल्पना व देशी वृक्षांचे महत्व, पर्यावरण व बीजारोपण संबंधित मार्गदर्शन केले.

खड्डे करण्यासाठी फॅक्टरीचे कंत्राटदार व सहकारी यांनी दोन दिवस अगोदर काम सुरू केले. विजय जगताप यांनी जेसीबीची व्यवस्था केल्यामुळे खड्डे वेळेत तयार झाले. देवराई फाऊंडेशनच्या रघुनाथ ढोले सरांनी देशी वृक्षाची 400 रोपे व हजारो बीया व बीज गोळे मोफत पुरवले. जे एस पी एम संस्थेच्या शाहू कॉलेजचे प्रा. प्रसाद जोशी व तीस पेक्षा जास्त विद्यार्थी व स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे 15 पेक्षा जास्त निसर्ग मित्र यांचा प्रत्यक्ष रोपे लावण्यात व बीजारोपण करण्याचा मोलाचा सहभाग ( Dehu Road ) नोंदवला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.