Pimpri : … भामा-आसखेड पाईप लाईनचे काम पोलीस बंदोबस्तात

एमपीसी न्यूज –  भामा-आसखेड धरणातून थेट पाईप लाईनव्दारे पाणी आणण्याच्या प्रकल्पाला प्रशासकीय (Pimpri)  स्तरावर गती देण्यात आली असून आतापर्यंत वरिष्ठ स्तरावर तीन बैठका झाल्या आहेत. पाईप लाईनचे वेगाने आणि आवश्‍यक असेल तेथे पोलीस बंदोबस्तात कामकाज सुरू असल्याचे  महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.

भामा-आसखेड धरणातून थेट पाईप लाईनव्दारे 167 दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी आणले जाणार आहे. यासाठी महापालिकेच्या वतीने ज्या ठिकाणी जागा ताब्यात मिळाली आहे. त्या ठिकाणी पाईप लाईनचे कामकाज सुरू करण्यात आले आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाईप लाईनसाठी पालिकेला तत्काळ जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी एका समितीची नेमणूक केली आहे. तसेच तीन बैठकादेखील झाल्या आहेत.

Dehu Road : आषाढी एकादशी निमित्त ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरातील टेकडीवर देवराईतर्फे वृक्षारोपण

सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ,  वन विभाग, जलसंपदा विभागाच्या जागेतून पाइपलाइन टाकण्यात येत आहे.  सध्या पाईप लाईन वेगाने आणि आवश्‍यक असेल तेथे पोलीस बंदोबस्तात कामकाज सुरू आहे. काही ठिकाणी पाईप लाईनसाठी आवश्‍यक असलेली उर्वरित जागाही दोन महिन्यांच्या आत पालिकेच्या ताब्यात येईल, असेही आयुक्त सिंह यांनी सांगितले. तसेच अशुध्द जलउपसा केद्राचे (जॅकवेल)चे काम पूर्ण होताच पाईप लाईनचेही काम पूर्ण  होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त (Pimpri)  केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.