Pune : मणिपूर येथील महिलांवरील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ पुण्यात ठाकरे गटाकडून आंदोलन

एमपीसी न्यूज : मागील दोन महिन्यापासून मणिपूर येथे (Pune) हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. या सर्व घटना दरम्यान दोन महिलांवर अत्याचार झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुण्यात ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या शहर संघटीका सविता मते यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. तर यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

या आंदोलनामध्ये माजी नगरसेविका संगीता ठोसर, माजी नगरसेविका पल्लवी जावळे यांच्या सह आजी माजी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

यावेळी सविता मते म्हणाल्या की, मणिपूर येथे दोन महिन्यापासून (Pune) जाळपोळ आणि हिंसाचाराच्या घटना घडत आहे. त्या दरम्यान दोन महिलांवर अत्याचार झाल्याचा व्हिडीओ समोर आला. त्या घटनेवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश चंद्रचूड यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करीत, तुम्ही हस्तक्षेप किंवा कारवाई न केल्यास आम्ही पावल उचलू अशी भूमिका मांडली.

त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिका मांडली. यामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारवाईचे आश्वासन दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन महिन्या पूर्वीच पुढाकार घेतला पाहिजे होता. आज त्या प्रसंगाला तेथील महिलांना सामोरे जावे लागले नसते.

Raigad News : इर्शाळवाडी दरड दुर्घटनेत तीन बैल, एका शेळीचा मृत्यू

त्यामुळे आम्ही एकूणच केंद्र सरकाराच्या भूमिकेचा निषेध व्यक्त करतो. तसेच पीडित महिलांना आणि मणिपूर येथील जनतेला केंद्र सरकारने न्याय द्यावा, अन्यथा भविष्यात केंद्र सरकार विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा त्यांनी दिला.

तसेच त्या पुढे म्हणाल्या की, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ या दोघी महिलांच्या प्रश्नावर नेहमी आवाज उठवतात. तर आज मणिपूर येथील महिलांच्या अत्याचाराच्या घटनेवर त्या गप्प का? असा सवाल उपस्थित करीत त्यांच्यावर त्यांनी यावेळी निशाणा साधला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.