Pune : अजित पवार आता गप्प बसा  – राज ठाकरे 

एमपीसी न्यूज- जागतिक व्यंगचित्र दिनाच्या (Pune)  पार्श्वभूमीवर पुणे आंतरराष्ट्रीय महोत्सव 2023 चे उदघाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्टून्सट कम्बाईनचे अध्यक्ष संजय मिस्त्री,युवा संवाद सामाजिक संस्थेचे अध्यक्ष धनराज गरड उपस्थित होते.

 

त्यावेळी राज ठाकरे यांनी सर्व व्यंगचित्र पाहून कलाकार मंडळींच कौतुक देखील यावेळी केले.त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी राज ठाकरे यांच्याकडे व्यंगचित्र काढण्याचा आग्रह केला.

 

Pune : वेश्याव्यवसाय प्रकरणी आयुर्वेदीक उपचार केंद्रावर पोलिसांचा छापा, दोन महिलांची सुटका

 

गेली दोन चार दिवस जे काही चालले आहे ते पाहून अजित पवार यांचे चित्र काढतो.मी चित्र काढण्याचा प्रयत्न करतो.मला ते कितपत येईल ते माहिती नाही.अस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थितीताना सांगितले.

 

त्यानंतर केवळ तीन मिनिटात राज ठाकरे यांनी अजित पवार यांचे व्यंगचित्र काढले आणि ते पूर्ण होताच आता पुढे काय लिहू आता गप्पा बसा असे राज ठाकरे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

 

 

आता यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून (Pune) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या व्यंगचित्रावर काय प्रतिक्रिया येते हे पाहणे जरुरीचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.