Maval : शिरगाव येथील वनक्षेत्रात सुरु आहे हजारो वृक्षांची कत्तल

एमपीसी न्यूज – वडगाव वनपरिक्षेत्राच्या अखत्यारीत असलेल्या (Maval ) घोरावडेश्वर डोंगर परिसरात हजारो वृक्षांची कत्तल करण्याचा घाट घातला जात आहे. वनीकरणाच्या नावाखाली हा प्रकार सुरु असून मोठ्या क्षेत्रातील जुनी झाडे तोडली जात आहेत.

Pune : अजित पवार आता गप्प बसा  – राज ठाकरे 

घोरावडेश्वर डोंगर परिसरात मोठी वनसंपदा आहे. इथे तरस, मोर, भेकर, ससा, वानर, साप, घोरपड, खोकड, उद मांजर, बिबट असे अनेक प्राणी आढळतात. या भागात अनिवासी पक्ष्यांची संख्या देखील मोठी आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांचा मोठा अधिवास म्हणून या डोंगर परिसराला ओळखले जाते. शिरगाव हद्दीतील डोंगर भागात वन विभागाकडून गुरुवारी (दि. 4) झाडे तोडण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

ग्लिरिसिडिया प्रजातीचे सुमारे 40 वर्ष जुने असलेले हजारो वृक्ष काढण्यात येणार आहेत. नवीन वृक्षांची लागवड करण्याच्या नावाखाली मोठ्या वृक्षांना मारण्याचा घाट यानिमित्ताने घातला जात आहे. तळेगाव येथील एका खासगी एजंटच्या माध्यमातून ही वृक्षतोड सुरु आहे. त्यामुळे अनेक निसर्गप्रेमींकडून या वृक्षतोडीचा विरोध केला जात आहे.

ग्लिरिसिडिया प्रजातीचे वृक्ष तोडण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना देखील थेट परवानगी नाही. महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत (विनियमन) अधिनियम 1964च्या कलम तीन नुसार कोणतीही झाडे तोडण्यास परवानगी नाही. झाडे तोडण्यासाठी नेमून दिलेल्या वृक्ष अधिकाऱ्याची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे. झाडे मुळापासून न काढता काही अंतरावरून त्याला छाटण्याची परवानगी दिली जाते.

दोन हेक्टरच्या टप्प्यात ही परवानगी दिली जाते. दोन हेक्टरवर वृक्षारोपण करून त्याचे ठराविक कालावधीत संगोपन केल्यानंतर पुढील जागेतील झाडे छाटण्याची परवानगी दिली जाते. असे असताना वडगाव वनपरिक्षेत्र कार्यालयाकडून थेट वृक्षांची कत्तल केली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. हा घाट कुणासाठी आणि कुणाच्या आशीर्वादाने सुरु आहे, असा सवाल देखील स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.

पुणे विभागाचे मुख्य वनसंरक्षक (Maval ) प्रवीण एन आर यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही. त्यांच्याशी संपर्क होताच वन विभागाची बाजू मांडण्यात येईल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.