Pune : हुजूरपागा शाळेतील माजी विद्यार्थीनींचा स्नेहमेळावा संपन्न

एमपीसी न्यूज : हुजूरपागा (Pune) या शाळेतील 1993 – 94 च्या बॅचचा माजी विद्यार्थीनींचा स्नेहमेळावा 22 जानेवारी रोजी पार पडला. या कार्यक्रमात माजी मुख्याध्यापिका अलका काळे आणि इतर आजी व माजी शिक्षिका उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात जन गण मन या राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली धारवाडकर आणि शीतल बागूल-सोनगीरकर यांनी केले. तर, शाळेच्या माजी विद्यार्थीनी मधुराणी गोखले-प्रभुलकर, मंजुरी ओक-दाते, सुप्रिया शिंदे-जगदाळे, क्रांती गौड-जाधव, अंजूश्री मुळीक- आकडे यांची मुलाखत शिल्पा कहाणे यांनी घेतली.
तर, कार्यक्रमाची (Pune) सांगता हळदी कुंकू व अल्पोपहाराने झाली. कार्यक्रमाचे सर्व आयोजन दिपाली धारवाडकर-बोरकर, शिल्पा तेली- कहाणे, शीतल बागूल-सोनगीरकर, पल्लवी शेळके-कदम, पूनम शेडगे-भगत, हर्षा माळवे, शिल्पा कुलकर्णी, प्रीती टेके, सुखदा कालेलकर-मुरूडेश्वर या सर्वांनी केले.