Pune : ‘संशोधन पद्धती’ या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – औंध येथील रयत शिक्षण संस्थेचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत विद्यार्थी विकास मंडळ आणि वाणिज्य विभागाच्यावतीने “संशोधन पद्धती” या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा घेण्यात आली.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य बोरावके महाविद्यालयाचे डॉ. के एन.शिंदे, आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयाचे डॉ. सुधीर बोराटे, डॉ.संजय नगरकर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास सदाफळ, प्रा. मयूर माळी, प्रा.कुशल पाखले, डॉ. तानाजी हातेकर, डॉ.अतुल चौरे उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. के. एन. शिंदे म्हणाले की, आपले संशोधन नावीन्यपूर्ण असावे. तसेच आपले संशोधन समाजोपयोगी असावे. आपल्या संशोधनामुळे अनेकांचे कल्याण होणार असेल तरच़ ते उत्कृष्ट संशोधन असते.

डॉ. संजय नगरकर म्हणाले की, आपण संशोधनाचा विषय कसा निवडावा, संशोधन कसे करावे, यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. बोराटे म्हणाले की, आपण संशोधनासाठी विषय निवडल्यानंतर त्याची मांडणी कशी करावी, तसेच संशोधन करताना कोणते नियम पाळावेत यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.

महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुश्री बोबडे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती निर्माण व्हावी. तसेच विद्यार्थ्यांनी समाजउपयोगी नाविन्यपूर्ण शोध लावावेत. अशा हेतूने ही एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या संशोधनाचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ठसा उमटवावा. तसेच स्वतःच्या नावावर पेटंट मिळवावे. असे मत डॉ. मंजुश्री बोबडे यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांची ओळख कॉमर्स विभागाचे प्रमुख डॉक्टर सुहास निंबाळकर यांनी तर आभार विद्यार्थी विकास मंडळाच्या चेअरमन डॉ.शशी कराळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आसावरी शेवाळे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.