Pune : स्वस्त धान्य दुकान परवाना मिळण्यासाठी अर्ज करा

एमपीसी न्यूज – पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरामधील (Pune) अन्नधान्य वितरण कार्यालयाअंतर्गत 11 परिमंडळ अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात 25 रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. परवाना मिळण्यासाठी 31 जुलै 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन अन्नधान्य वितरण अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे.

रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्याबाबतचा जाहिरनामा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर https://pune.gov.in उपलब्ध आहे. या जाहीरनाम्यात सविस्तर अटी व शर्ती, आवश्यक कागदपत्रांचा तपशील, नमुना अर्ज आदीबाबतची माहिती समाविष्ट आहे. संबंधित परिमंडळ कार्यालयात याबाबत संपूर्ण तपशील व कोरे अर्ज उपलब्ध आहेत.

Vadgaon : दुर्दैव… शाळेत न्यायला स्कूल बस आली, पण त्याला रुग्णवाहिकेतून नेलं जात होतं..

इच्छुकांनी विहित मुदतीत अर्ज करावेत; मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नसल्याचेही अन्नधान्य वितरण अधिकारी दादासाहेब गिते यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.