Pune : कृषि निविष्ठा गुणवत्ता व पुरवठ्याबाबत कृषि आयुक्तालयात नियंत्रण कक्ष स्थापन

एमपीसी न्यूज – खरीप हंगामात राज्यातील (Pune) शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठा म्हणजेच बियाणे, खते व किटकनाशके यांचा पुरवठा वेळेत, मुबलक प्रमाणात होण्यासाठी व शेतकरी, उत्पादक, वितरक व विक्रेते यांना क्षेत्रीयस्तरावर येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणींचे निवारण करण्याकरिता आयुक्तालय स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती निविष्ठा व गुण नियंत्रणचे कृषि संचालक विकास पाटील यांनी दिली आहे.

स्थापन करण्यात आलेला नियंत्रण कक्ष हा कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी 24 तास सूरू राहणार असून संपर्क साधण्यासाठी भ्रमणध्वणी क्रमांक 8446117500, 8446221750, 8446331750 उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. कृषि विभागाचा टोल फ्री क्रमांक 18002334000 या क्रमांकावरही संपर्क करता येईल.

Pune : स्वस्त धान्य दुकान परवाना मिळण्यासाठी अर्ज करा

यासोबतच अडचण किंवा तक्रार [email protected] या ईमेल पत्त्यावरही पाठविता येईल.

तक्रारी कोऱ्या कागदावर लिहून व्हॉटस्ॲप वर किंवा ई-मेलवर पाठवलेल्या तक्रारी देखील स्वीकारल्या जातील. व्हॉट्सॲपद्वारे तक्रारी पाठवणे शक्य नसल्यास भ्रमणध्वणी क्रमांकावर (Pune) तोंडी तक्रारी नोंदविल्या तरी चालतील. संबंधितांनी निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिंकींग बाबत असलेल्या तक्रारी व अडचणींचा संक्षिप्त तपशिल भ्रमणध्वणी, टोल फ्री क्रमांक व ई-मेलवर कळवावा असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.