Pune Blackmailing Case : अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी, आणखी एका तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज : सोशल मीडियावर (Pune Blackmailing Case) तरुण मुलांसोबत ओळख वाढवून त्यांच्यासोबत अश्लील भाषेत चॅटिंग करायची. नंतर तरुणांना व्हिडिओ कॉल करून अर्धनग्न होण्यास भाग पाडायचे आणि हेच व्हिडिओ व्हायरल करून ब्लॅकमेल करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढले आहेत. अशा प्रकारच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून पुण्याच्या दत्तवाडी परिसरातील आणखी एका तरुणाने आत्महत्या केली आहे. शंतनु असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. 
याप्रकरणी या तरुणाच्या भावाने फिर्याद दिली असून दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तवाडीतील एका सोसायटीत 28 सप्टेंबर रोजी हा प्रकार घडला होता.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांच्या भावाचे इंस्टाग्राम या सोशल मीडियावरून एका अनोळखी प्रीत यादव नावाच्या व्यक्तीसोबत ओळख झाली होती. दोघेही एकमेकांसोबत चॅटिंग करायचे. दरम्यान प्रीत यादव नामक व्यक्तीने फिर्यादी यांच्या भावाला अर्धनग्न फोटो पाठवण्यास सांगितले होते. फिर्यादीनेही हे फोटो पाठवले. नंतर, मात्र हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याच्याकडे पैसे मागण्यास सुरुवात झाली. शंतनू यांनी साडेचार हजार रुपये संबंधित व्यक्तीला दिलेही.
मात्र, फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन पुन्हा पुन्हा (Pune Blackmailing Case) पैसे मागितले जात होते. या त्रासाला कंटाळून शंतनू याने 28 सप्टेंबर रोजी घराच्या इमारतीवरून खाली उडी मारून आत्महत्या केली. दरम्यान फिर्यादींच्या कुटुंबीयांनी अंत्यविधी आणि इतर सर्व विधी पार पाडल्यानंतर याप्रकरणी तक्रार दिली. दत्तवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.