Pune Crime News : व्यवस्थापकाच्या जाचामुळे तरुणाची आत्महत्या

एमपीसी न्यूज -खासगी वित्तीय संस्थेत वसुली प्रतिनिधी म्हणून ( Pune Crime News ) काम करणाऱ्या तरुणाने व्यवस्थापकाच्या जाचामुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खासगी वित्तीय संस्थेतील व्यवस्थापकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उत्तम सखाराम धिंडले (वय 27, रा. भैरवनाथनगर, किरकीटवाडी, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी खासगी वित्तीय संस्थेतील व्यवस्थापक अमन खुराणा (वय 24, रा. विमाननगर) याला अटक करण्यात आली आहे.

Today’s Horoscope 17 February 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

धिंडले हे  एका खासगी वित्तीय संस्थेत काम करत होता. धिंडले याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच हवेली पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. धिंडले याने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली होती. पोलिसांनी चिठ्ठी जप्त केली.

वित्तीय संस्थेचे व्यवस्थापक खुराणा यांच्या जाचामुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे धिंडले यांनी चिठ्ठीत नमूद केले.खुराणा कर्जदारांकडून वसुली करण्यासाठी दबाब आणत होता. खुराणाच्या ( Pune Crime News ) जाचामुळे धिंडलेने आत्महत्या केल्याचे चौकशीत उघडकीस आले आहे. हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.