Pune Crime News : मेफेड्रॉन बाळगणार्‍या तरुणांना अटक; 14 लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज- मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ बाळगणाऱ्या दोघा तरुणांना गुन्हे शाखेच्या ( Pune Crime News) अंमली पदार्थ विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून 20 ग्रॅम 133 मिलीग्रॅम वजनाचे 14  लाख 37 हजारांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले.

गेल्या काही दिवसात शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी होत असल्याचे दिसत आहे. पदमसिंह हेमंत पाटील (वय 23, पाषाण रोड, सुसगाव) व यश संतोष शिंदे (वय 22, रूणवाल सोसायटी, वारजे) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Pune Crime News : व्यवस्थापकाच्या जाचामुळे तरुणाची आत्महत्या

अमली पदार्थ विरोधी पथक हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पथकाला भुसारी कॉलनी येथील लोहिया जैन आयटी पार्कजवळ दोघे अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची ( Pune Crime News) माहिती मिळाली होती. त्यानुसार दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून 4 लाख 26 हजाराचे एमडी, वजन काटा, एक कार असा 14 लाख 37 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.