Pune Crime News : ऑस्ट्रेलियात नोकरीच्या आमिषाने 2 कोटी रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज -ऑस्ट्रेलिया येथील कंपनी मार्फत व्हिसा काढून देऊन नोकरी देण्याचे ( Pune Crime News ) आमिष दाखवून तरुणांना बनावट ऑफर लेटर देऊन त्यांची तब्बल 2 कोटी 38 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी एका 42 वर्षाच्या महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शिवम ऊर्फ सॅम जोशी (रा. ऑस्ट्रेलिया) आणि एक महिला (रा. नागपूर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ताडीवाला रोड येथील न्यू एडियु व्हिजन कन्सलटन्सी येथे जानेवारी 2019 ते ऑगस्ट 2022 दरम्यान घडला.

Pune Crime News : मेफेड्रॉन बाळगणार्‍या तरुणांना अटक; 14 लाखांचा मुद्देमाल जप्त

 तक्रारदारांची ताडीवाला रोड येथील हेरीटेज अपार्टमेंटमध्ये न्यु एडियु व्हिजन कन्सलटन्सी ही कंपनी आहे. त्यांच्या कंपनीतील इच्छुकांनी ऑस्ट्रेलिया स्किल व्हिसा प्रायव्हेट लिमीटेड कंपनीमार्फत व्हिसा काढून देऊन नोकरी देणार असल्याचे सांगून विश्वास संपादन केला.

ऑस्ट्रेलिया येथील नामांकित हॉटेलचे बनावट ऑफर लेटर दिले. ऑफर लेटर पाहून तक्रारदार व त्यांच्या कंपनीतील इतर अर्जदारांनी व्हिसा व अन्य कामासाठी त्यांना 2 कोटी 38 लाख 18 हजार रुपये पाठविले. पण, नंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पुढील तपास ( Pune Crime News ) पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.