Stray Animals : नवी सांगवी, पिंपळेगुरवमधील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा – आण्णा जोगदंड

एमपीसी न्यूज – पिंपळेगुरव, नवी सांगवीत मोकाट जनावरे (Stray Animals) रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसलेली असतात. किंवा बिनधास्तपणे उभी असतात. त्यामध्ये वळू यांचाही समावेश आहे. महापालिकेने या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड यांनी केली आहे.

स्मार्ट सिटी अंतर्गत सगळीकडे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम चालू आहे. अधूनमधून पाऊस पडत असल्यामुळे रस्ते निसरडे होतात. नागरिक आपल्या व्यवसायासाठी व नोकरीसाठी किंवा दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडत आहेत.

नागरिकांना व वाहनांना ही मोकाट जनावरे घाबरत नाहीत. नागरिकांनी हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला तर वेळप्रसंगी अंगावरही धावून येतात. वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते. अशावेळी अपघात होण्याची दाट शक्यता असते. मोकाट जनावरांचा धोका वाहनचालकांबरोबरच जेष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांनाही आहे. अनेक ठिकाणी सकाळ-संध्याकाळ, मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे उभी असतात.

यावेळी आण्णा जोगदंड म्हणाले कि, महापालिकेने (Stray Animals) अशा मोकाट जनावरांच्या तावडीतून नागरीकांची सुटका करावी. पोलिसांनी पण अशा मोकाट जनावरांच्या मालकाला जबाबदार धरावे. बऱ्याच गोठा मालकाकडे चाऱ्याची सोय नसल्याने मोकाट जनावरे मोकळे सोडतात. बहुतांश गोशाळामध्ये मर्यादेपेक्षा अधिक जनावरे असतात.

निवेदनावर उपाध्यक्ष विकास शहाणे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगिता जोगदंड, कार्याध्यक्ष मुरलीधर दळवी, गजानन धाराशिवकर यांनी स्वाक्षरी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.